स्ट्रोकनंतर हाताची शक्ती वाढविणारे ‘वेयरेबल्स’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2016 07:49 AM2016-02-10T07:49:36+5:302016-02-10T13:19:36+5:30

साऊथहॅम्पटन विद्यापीठातील संशोधकांची एक टीम असे वायरलेस बाही (अस्तनी) तयार करत आहेत जी रोजच्या वापरातून रुग्णाच्या हाताची हालचाल आणि शक्तीची माहिती रेकॉर्ड करेल. 

'Weareables' that increase the arm strength after stroke | स्ट्रोकनंतर हाताची शक्ती वाढविणारे ‘वेयरेबल्स’

स्ट्रोकनंतर हाताची शक्ती वाढविणारे ‘वेयरेबल्स’

googlenewsNext
ong>स्ट्रोकच्या रुग्णांचे पुर्नवसन करणे ही फार जबाबदारीची गोष्ट आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येतो. त्यामुळे घरी असताना रुग्णांच्या आरोग्याची माहिती गोळा करणे महत्त्वाचे असते. यासाठी या वेयरेबल बाही (अस्तनी)चा उपयोग होणार आहे.

 स्ट्रोकनंतर हाताची हालचाल आणि शक्ती वाढविण्यासाठी वेयरेबल तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इंग्लंडच्या संशोधकांची धडपड सुरू आहे. साऊथहॅम्पटन विद्यापीठातील संशोधकांची एक टीम असे वायरलेस बाही (अस्तनी) तयार करत आहेत जी रोजच्या वापरातून रुग्णाच्या हाताची हालचाल आणि शक्तीची माहिती रेकॉर्ड करेल.

प्राध्यापिका जेन बरीज यांच्या मार्गदर्शनात संशोधक हे काम करत आहेत.  दोन वर्षांच्या या प्रोजेक्टला नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चने (एनआयएचआर) १ मिलियन पाऊंड (दहा कोटी रु.) अनुदान दिले आहे. ‘इन्व्हेंशन फॉर इन्नोव्हेशन (आय४आय)’ असे या प्रोजेक्टचे नाव आहे. स्ट्रोकच्या रुग्णांचे पुर्नवसन करणे ही फार जबाबदारीची गोष्ट आहे.

काही दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येतो. त्यामुळे घरी असताना रुग्णांच्या आरोग्याची माहिती गोळा करणे महत्त्वाचे असते. यासाठी या वेयरेबल बाही (अस्तनी)चा उपयोग होणार आहे. डॉक्टरांना रुग्णांच्या प्रगतीवर यामुळे लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.

मेकानामिग्राफि (एमएमजी) मायक्रोफोनसारख्या सेन्सर्सद्वारे मसल व्हायब्रेशन, मुव्हमेंट तपासण्यात येते. यातून हाती आलेल्या डेटाच्या आधारे रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यास मदत होणार आहे.

Web Title: 'Weareables' that increase the arm strength after stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.