चारचौघात हटके दिसायचंय? ट्राय करा 'हे' आकर्षक हेअर कलर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:19 PM2019-02-06T13:19:09+5:302019-02-06T13:23:55+5:30

हेअर कलर्स आणि हेअर स्टाइलबाबत महिला फारच संवेदनशील असतात. कारण त्यांना माहीत असतं की, केस हे त्यांच्या सौंदर्यात भर घालणारे महत्त्वपूर्ण भाग असतात.

Trending hair highlighting techniques styles | चारचौघात हटके दिसायचंय? ट्राय करा 'हे' आकर्षक हेअर कलर!

चारचौघात हटके दिसायचंय? ट्राय करा 'हे' आकर्षक हेअर कलर!

Next

(Image Credit : abigailseymour.com)

हेअर कलर्स आणि हेअर स्टाइलबाबत महिला फारच संवेदनशील असतात. कारण त्यांना माहीत असतं की, केस हे त्यांच्या सौंदर्यात भर घालणारे महत्त्वपूर्ण भाग असतात. चांगली हेअर स्टाइल आपला आत्मविश्वास वाढवतात आणि व्यक्तिमत्त्वही खुलवतात. तुम्हालाही हेअर कलर करायचे असतील तर कोणता कलर निवडावा हे तुमच्या केसांच्या रंगावर डिपेन्ड असतं. आम्ही तुमच्यासाठी हेअर कलरचे काही पर्याय घेऊन आलो आहोत. हे ट्राय करून तुम्ही हटके लूक मिळवू शकता. 

ब्लांचे हेअर कलर

(Image Credit : people.com)

सध्या या हेअर कलरची फारच क्रेझ बघायला मिळत आहे आणि सतत ट्रेंड होत आहे. याला पेंटिंग हेअर स्टाइल असही म्हटलं जातं. यात केसांना वेगवेगळ्या जागेवर कलर केलं जातं. यानंतर सूर्यप्रकाशात केसं चमकतात. पण हा हेअर कलर वापरण्याआधी याची काळजी घ्या की, कलर तुमच्या स्किन कलरचा असू नये. 

हेअर कंटूरिंग

(Image Credit : www.supercuts.co.uk)

हा हेअर कलर नवीन आहे. ज्याप्रकारे मेकअप कंटोरिंग करतात, त्याचप्रमाणे हेअर स्टाइलमध्ये चेहऱ्याच्या आजूबाजूच्या केसांना हलका आणि डार्क टोन कलर करतात. याने चेहऱ्यावरील मेकअपची रंगत आणखी वाढते. यात तुम्ही हलक्या हायलाइटचा प्रयोग करू शकता.

ओम्ब्रे हायलाइट्स

(Image Credit : www.matrix.com)

या हेअर स्टाइलला आपल्याकडे डुबकी हेअर स्टाइल असंही म्हटलं जातं. कारण यात केसांचं एक टोक कलरमध्ये बुडवलं जातं तर दुसरं कोरडं असतं. या हेअर स्टाइलमध्ये केसांची फार काळजीही घ्यावी लागत नाही. पण या हेअर स्टाइलमध्ये कलर केसांच्या मुळात जातो आणि वरचा भाग हलका कलर केलेला असतो. 

रिब्‍बन्‍ड हेयर

(Image Credit : DealsandYou.com)

ज्या महिला त्यांचे केस नेहमी मोकळे ठेवतात किंवा ज्यांना केस बांधून ठेवणे पसंत नसतं, त्यांच्यासाठी ही कलर स्टाइल परफेक्ट ठरेल. यात तुम्ही जांभळ्या किंवा गुलाबी रंगाचा वापर करून केस सुंदर करू शकता. कलर केल्यावर केस मोकळे सोडल्यास वेगळाच लूक मिळेल. 

लॉ लाइट्स

ही केसांना कलर करण्याची परफेक्ट स्टाइल मानली जाते. यासाठी हलक्या रंगाचा वापर करून केसांना हायलाइट करू शकता. यात अशा रंगांचा वापर केला जातो, ज्यात केसांचा रंग दाबण्यापेक्षा त्यांना हायलाइट करतो. 

अंडर लाइट्स 

(Image Credit : www.matrix.com)

इंद्रधनुष्यासारखी दिसणारे रंग या स्टाइलमध्ये वापरले जातात. यात केसांच्या खालच्या बाजूला कलर केला जातो. पण ही स्टाइल करण्यापूर्वी एक्सपर्ट सल्ला नक्की घ्या.

Web Title: Trending hair highlighting techniques styles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.