कांद्याच्या सालीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 11:39 AM2018-06-30T11:39:43+5:302018-06-30T11:40:10+5:30

कांद्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काद्यांची साल उपयोगी पडू शकते. चला जाणून घेऊया कांद्याच्या सालीचे फायदे.

Surprising benefits of onion skin | कांद्याच्या सालीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

कांद्याच्या सालीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

googlenewsNext

कांद्याचे काय फायदे आहेत हे जवळपास सर्वांनाच माहीत असावेत. पण कांदा कापला की त्याची साल आपण कचऱ्यात फेकून देतो. पण अनेकांना हे माहीत नाहीये की, कांद्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काद्यांची साल उपयोगी पडू शकते. चला जाणून घेऊया कांद्याच्या सालीचे फायदे.

कोलेस्ट्रॉल कमी करणे

कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि ते पाणी सकाळी प्यायल्यास अनेक फायदे होतात. याची पाण्याची टेस्ट जरी चांगली नसली तरी यात साखर टाकून प्यायल्यास फायदा दिसेल. रोज याचे सेवन केल्यास बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. 

अॅलर्जीपासून सुटका

जर तुम्हाला स्कीन अॅलर्जीची समस्या असेल तर कांद्याची साल तुम्हाला फायद्याची ठरु शकते. रात्रभर काद्यांची साल पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी स्कीनवर लावा. काही दिवस हे रोज केल्यास अॅलर्जीपासून आराम मिळेल. 

केसांना फायदा

मुली केसांना मुलायम आणि चमकदार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कंडीशनर वापरतात. पण कांद्याच्या सालीनेही तुम्हाला हे करता येतं. कांद्याच्या सालीच्या पाण्याने केस धुतल्यास केस चमकदार आणि मुलायम होतील. 

चेहऱ्यावरील डाग

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी वेगवेगळ्या महागड्या उत्पादनांचा वापर केला जातो. कांद्याच्या रसयुक्त सालीमध्ये हळद मिश्रित करुन चेहऱ्यावर लावल्यास डाग दूर होतील. काही दिवस तुम्हाला हा उपाय करावा लागेल. 

गाल मुलायम करण्यासाठी

गाल कोरडे झाल्यास कांद्याचा उपयोग केला जाऊ शकतो. कांद्याची साल गरम पाण्यात उकळून त्याचा वापर करा. याने गाल मुलायम होतील.

Web Title: Surprising benefits of onion skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.