'हे' ऑइल मास्क वापरून केस ठेवा चमकदार आणि सुंदर, कसं कराल तयार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 10:54 AM2019-06-13T10:54:23+5:302019-06-13T10:54:45+5:30

केसांना पोषण देण्यासाठी आणि रखरखीतपणा दूर करण्यासाठी केसांना तेल लावणं गरजेचं असतं.

Oil masks which make hair beautiful and strong | 'हे' ऑइल मास्क वापरून केस ठेवा चमकदार आणि सुंदर, कसं कराल तयार?

'हे' ऑइल मास्क वापरून केस ठेवा चमकदार आणि सुंदर, कसं कराल तयार?

Next

(Image Credit : ohsimply.com)

केसांना पोषण देण्यासाठी आणि रखरखीतपणा दूर करण्यासाठी केसांना तेल लावणं गरजेचं असतं. पण तेलाने तयार केलेले हेअर मास्क केसांना सुंदर बनवणे आणि पोषण देण्यासोबतच इतरही समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. चला जाणून घेऊ कोणत्या नैसर्गिक तत्त्व मिश्रित करून तुम्ही केसांसाठी चांगला हेअर मास्क बनवू शकता.

खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं जे केसांना सुंदर बनवतं. खोबऱ्याचं तेलाचा हेअर मास्क केसांना पोषण देण्यासोबतच त्यांना मुलायम आणि सरळ करण्याचं काम करतो. खोबऱ्याच्या तेलाचा हेअर मास्क तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये ३ चमचे खोबऱ्याचं तेल, एक चमचा अॅलोवेरा जेल, एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस इत्यादी गोष्टी एकत्र करून केसांना लावा. २ तासांनी केस शॅम्पूने धुवावे.

आर्गन ऑइल

आर्गन तेलापासून तयार हेअर मास्क केसांची सूर्याच्या प्रखर किरणांपासून रक्षा करतं. केसांना सुंदर करण्यासाठी आर्गन ऑइल हेअर मास्कचा वापर करण्यासाठी एका वाटीमध्ये ४ चमचे आर्गन ऑइल, एक चमचा अॅलोव्हेरा जेल, एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस इत्यादी गोष्टी एकत्र करा आणि केसांना लावा. २ तासांनी केस शॅम्पूने धुवावे.

कॅस्टर ऑइल

कॅस्टर बीन्सपासून तयार करण्यात येणाऱ्या कॅस्टर ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे तत्व केसांमध्ये कोंडा होत नाही. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी कॅस्टर ऑइल दोन चमचे, खोबऱ्याचं तेल एक चमचा, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, एक चमचा लिंबाचा रस मिश्रित करा आणि केसांना लावा. २ तासांनी केस स्वच्छ धुवून घ्यावे.

जोजोबा ऑइल

केसा हायड्रेट आणि काळे ठेवण्यासाठी जोजोबा ऑइलचा वापर फायदेशीर ठरतो. त्यासाठी एका वाटीमध्ये जोजोबा ऑइल ४ चमचे, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि एसेंशिअल ऑइल मिश्रित करा. हे मिश्रण केसांना लावा आणि २ तासांनी केस शॅम्पूने स्वच्छ धुवा.

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Oil masks which make hair beautiful and strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.