पार्लरमध्ये वेळ न घालवता घरच्या घरी 15 मिनिटात चेहरा उजळवण्याच्या सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 11:28 AM2018-07-02T11:28:09+5:302018-07-02T12:24:45+5:30

अनेकदा वेळे अभावी अनेकांना पार्लरमध्ये जाऊ फेशिअल करण्यास जमत नाही. अशावेळी घरच्या घरी काही टिप्सने तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. 

How to do facial at home in 4 easy steps | पार्लरमध्ये वेळ न घालवता घरच्या घरी 15 मिनिटात चेहरा उजळवण्याच्या सोप्या टिप्स!

पार्लरमध्ये वेळ न घालवता घरच्या घरी 15 मिनिटात चेहरा उजळवण्याच्या सोप्या टिप्स!

googlenewsNext

ऋतू कोणताही असो स्कीनवर काही ना काही प्रभाव होतोच. खासकरुन पावसाळ्यात स्कीनची काळजी घेणे फारच गरजेचे असतं. कारण पावसाच्या पाण्याचा आणि वातावरणाचा स्कीनवर परिणाम होतोच. त्यामुळे महिन्यातून एकदा फेशिअल करणं गरजेचं आहे. पण अनेकदा वेळे अभावी अनेकांना पार्लरमध्ये जाऊ फेशिअल करण्यास जमत नाही. अशावेळी घरच्या घरी काही टिप्सने तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. 

मॉइस्चराईज करा

सर्वातआधी चेहरा भीजलेल्या टिश्यूने चांगल्याप्रकारे स्वच्छ करा. त्यानंतर तुमच्या त्वचेनुसार मॉइस्चरायजर निवडा आणि हातांनी साधारण 5 मिनिटे चेहऱ्याची मसाज करा. 

स्टीम घ्या

एका भांड्यात पाणी गरम करा आणि गरम पाण्याची वाफ घ्या. साधारण 10 मिनिटे हे करा. याने तुमच्या चेहरा मुलायम होईल. 

मसाज करा

कोणत्याही फेशिअल क्रिमने चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे मसाज करा.

फेस पॅक लावा

त्वचेच्या प्रकारानुसार फेस पॅक लावा. फेस पॅक तुम्ही घरीही तयार करु शकता. 

आणखीही काही खास उपाय

* गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ‘इ’असते. त्यामुळे सौंदर्य वाढीसाठी गव्हाच्या कोंड्याचा वापर होऊ शकतो. त्यासाठी गव्हाचा कोंडा साईसकट दुधात एकत्र करुन जाडसर लेप तयार करावा. हा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजाळण्यास मदत होते. तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घ्यावे.

* एक चमचा मध, एक चमचा काकडीचा रस आणि एक चमचा संत्र्याचा रस घ्यावा. हे सर्व मिक्स करुन चेहऱ्याला १५ ते २० मिनिटांपर्यंत लावावे. याचा क्रिम म्हणून उपयोग होऊन चेहऱ्याच्या त्वचेची गुणवत्ता वाढते. 

* जायफळाचा उपयोग चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी होतो. त्यासाठी जायफळ पाण्यात उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे. 

* टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डग व वर्तुळे कमी होतात. पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहऱ्यावर देणे.

* टोमॅटोच्या आतील गर स्मॅश करुन चेहऱ्यावर लावणे. चेहऱ्यावर चमक येते व चेहरा निखरतो.

* चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.

* चेहऱ्यावर पिपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे

Web Title: How to do facial at home in 4 easy steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.