Fashion : ​साडी नेसा पण जरा हटके पद्धतीने !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2017 12:08 PM2017-07-11T12:08:37+5:302018-06-23T12:04:26+5:30

त्याच त्या पद्धतीने नेसली जाणारी साडी कंटाळवाणी वाटते, जाणून घ्या साडी नेसण्याच्या वेगळ्या पद्धती...

Fashion: Saadi Nasa but in a very different way! | Fashion : ​साडी नेसा पण जरा हटके पद्धतीने !

Fashion : ​साडी नेसा पण जरा हटके पद्धतीने !

Next
रतीय नारीची खास ओळख म्हणजे तिची साडी होय. साडी जरी पारंपरिक असली तरी आज तिच्या नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींवरून स्त्रीयांना एक आकर्षक लूक मिळत असतो. सामान्य स्त्रीच नव्हे तर सेलिब्रिटीदेखील मोठ्या आवडीने साडी नेसताना दिसतात. विशेषत: साडी ही कॅज्युअल, फॉर्मल, पारंपरिक अशा कोणत्याही प्रसंगी नेसता येते. मात्र नेहमी त्याच त्या पद्धतीने नेसली जाणारी साडी कंटाळवाणी वाटते. याच सहावारीला जर वेगवेगळ्या पद्धतीने नेसण्याचे कौशल्य तुमच्याकडे असेल तर कोणत्याही प्रसंगी तुम्ही हटके दिसू शकता.

* फुलपाखरु स्टाइल
अशाप्रकारची साडी नेसायची असल्यास शिफॉन किंवा नेटच्या कापडाची साडी निवडा. यामध्ये पदर इतका बारीक केला जातो ज्यामुळे पोट व नाभी दिसते. याला बॉलिवूड स्टाइल असेही म्हटले जाते. 

* साडी गाऊन 
कॉकटेल पार्टीला जाण्यासाठी हे एक परफेक्ट आऊटफिट आहे. ही स्टाईल कम्फर्टेबल व मॉडर्न पद्धत आहे. ज्यांना साडी नेसता येत नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यात तुमचा पाय जरी निऱ्यावर पडला तरी या साडी गाऊनला काहीही होणार नाही. 

* जलपरी साडी
 जलपरी साडी नेसण्यासाठी जरदोसी किंवा हेवी वर्क केलेली भरदार पदराची साडी निवडा. ही पद्धत कोणत्याही प्रकारचा बांधा असलेल्या स्त्रियांवर ही साडी शोभून दिसते. या प्रकारच्या साडीमुळे तुम्ही बारीक दिसता. यामध्ये साडीचा खालचा भाग अशाप्रकारे गुंडाळलेला असतो की, ती साडी स्कर्टसारखी दिसते. या साडीला निऱ्या नसतात.

* पॅन्ट स्टाइल साडी
अधिक ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही पॅन्ट स्टाइलची साडी वापरू शकता. यासोबत तुम्ही जॅगिंग किंवा लेगिंग, क्रॉप टॉप किंवा चोळी व हील्स  वापरू शकता. साडीचा एक काठ घेऊन त्याच्या निऱ्या करा. या निऱ्या पॅन्टमध्ये खोचून दुसरा काठ ओढणीप्रमाणे खांद्यावरून घ्या. 

* नऊवारी साडी 
ही महाराष्ट्रीयन पद्धत आहे. इतर साडी नेसण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत वेगळी आहे. ही साडी लांब असते. यासाठी परकर घालायची गरज नसते. नऊवारी साडी नेसून त्यावर मोठी नथ व केसांचा अंबाडा बांधून त्याभोवती गुंडाळलेला गजरा. बस, सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे आपोआप आकर्षित होईल.

* लहंगा साडी स्टाइल
लग्नसमारंभाच्या प्रसंगी मॉडर्न लूक मिळण्यासाठी हा ट्रेडिशनल पेहराव करु शकता. यासाठी घेरदार लहंगा किंवा स्कर्ट घालून त्यावर साजेशे ब्लाऊज घाला. यावर साध्या ओढणीऐवजी साडी घ्या. साडीच्या निऱ्या करून त्या मागच्या बाजूने कंबरेत मध्यभागी खोचा. उरलेला पदर ओढणीसारखा खांद्यावरून घ्या. 

Also Read : ​Fashion : ​दीपिका पादुकोनची या साड्यांना आहे खास पसंत !
                   : ​Fashion Trend : ​‘साडी’..फॅशन जगतात अजूनही टिकलेले नाव...!

Web Title: Fashion: Saadi Nasa but in a very different way!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.