चेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 12:27 PM2018-11-20T12:27:49+5:302018-11-20T12:30:40+5:30

काय तुमची त्वचा पिंपल्समुळे खराब झाली आहे? किंवा तुमच्या चेहऱ्यावर डाग पडले आहेत?

Amazing Benefits salt scrub for skin | चेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार? 

चेहरा चमकवण्यासाठी खास घरगुती सॉल्ट स्क्रब, कसा कराल तयार? 

Next

काय तुमची त्वचा पिंपल्समुळे खराब झाली आहे? किंवा तुमच्या चेहऱ्यावर डाग पडले आहेत? या समस्येपासून सुटका करुन घ्यायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी एका खास स्क्रबची माहिती घेऊन आलो आहोत. हा स्क्रब आबे सॉल्ट स्क्रब म्हणजे मिठापासून तयार स्क्रब. हा स्क्रब तुम्ही घरीच तयार करु शकता. केवळ यात तुम्हाला घरात सहज मिळणाऱ्या इतरही काही गोष्टींचा समावेश करावा लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे या स्क्रबने त्वचेचं नुकसान होत नाही. तर याने त्वचेवरील मृत पेशी दूर होतात आणि त्वचेवर चमक येते. चला जाणून घेऊ कसा तयार करायचा हा स्क्रब आणि याचे फायदे....

सॉल्ट स्क्रब

आंघोळ केल्यानंतर सैंधव मीठ म्हणजेच एप्सम सॉल्ट आणि स्क्रब आपल्या हातांच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर हात गोल फिरवत हे लावा. याने त्वचेवरील मृत पेशी दूर होतील आणि त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतील. जर नाकाजवळ जास्त ब्लॅकहेड्स असतील तर तिथे  हळुहळु स्क्रब करा. हा सॉल्ट स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरु शकता.

सैंधव मीठ आणि लेमन स्क्रब

हा त्वचेसाठी एक प्रभावी स्क्रब असून केवळ मिनिट भरात तयार होतो. लिंबाच्या रसाचे काही थेंब सॉल्ट स्क्रबमध्ये टाका आणि चेहऱ्यावर स्क्रब करा. याने पिंपल्स, मृत त्वचा आणि ब्लॅकहेड्स सहजपणे दूर होतात. 

सॉल्ट आणि ऑइल स्क्रब

आपली त्वचा स्वच्छ करण्यासाठी मिठात काही चांगल्याप्रकारचे तेल जसे की, लेवेंडर, पिपरमिंट किंवा रोजमेरी इत्यादी तेल मिश्रित करा. हा स्क्रब महिन्यातून केवळ एकदाच वापरा. याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील. 

घरगुती सॉल्ट स्क्रब

मीठ आणि बदाम तेल

हा स्क्रब तयार करण्यासाठी पाच चमचे बदाम तेल आणि बारा चमचे मीठ मिश्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हळुवारपणे चेहऱ्याला आणि कपाळावर स्क्रब करा. 

सैंधव मीठ आणि मध

उन्हाळ्यात हा एक चांगला स्क्रब ठरु शकतो. मध यात टाकल्याने टॅनिंग दूर होते आणि मृत त्वचाही दूर होते. एक चमचा मध आणि त्यात थोडं मीठ टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

मीठ आणि ओटमील

हा स्क्रब तयार करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये दोन चमचे ओटमील, एक चमचा सैंधव मीठ, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्यावे लागतील. हे मिश्रण चेहऱ्यावर दोन मिनिटांसाठी लावून चेहरा स्क्रब करा. नंतर पाच ते सहा मिनिटांनी थंड पाण्याचे चेहरा धुवा. 

हलक्या हाताने करा स्क्रब

स्क्रबने त्वचा मुलायम होते, पण याचा जास्त वापर केल्याने त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे स्क्रब रोज करु नये. आठवड्यातून दोनदा स्क्रब केलं जाऊ शकतं. जास्त स्क्रब केल्याने त्वचा रखरखीत होते आणि त्वचेची चमकही कमी होते. त्यामुळे जेव्हाही स्क्रब कराल तेव्हा हलक्या हाताने करा. 

स्क्रबिंग नंतर...

स्क्रबिंग केल्यानंतर त्वचेची स्वच्छताही चांगली केली पाहिजे. याने त्वचेवर जास्त चमक येईल. यासाठी काकडीचा ज्यूस, टोमॅटो ज्यूस, पपईचा गर आणि केळ्याचा गर वापरता येतो. त्यासोबतच मॉइश्चरायजरही लावू शकता. 

(टिप : प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगवेगळी असते. त्यामुळे काहींना याचा फायदा होईलच किंवा हे सूट होईलच असे नाही. त्यामुळे हा उपाय करण्याआधी त्वचेचा टाइप जाणून घ्या किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यानंतरचा याचा वापर करा.) 
 

Web Title: Amazing Benefits salt scrub for skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.