अॅक्सेसरीजची विविधता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 06:00 PM2017-08-14T18:00:35+5:302017-08-14T18:00:54+5:30

वाहनांसाठी अतिरिक्त साधनसामग्री आवर्जून खरेदी केली जाते. शोरूममधून कार घेतल्यानंतर त्यात मनात असलेली सर्व साधने मिळत नाहीत. या अॅक्सेसरीजचा बाजार आज खूप मोठा व भुलभुलैय्या आहे.

Variety of accessories | अॅक्सेसरीजची विविधता

अॅक्सेसरीजची विविधता

Next

दुचाकी, चारचाकी इतकेच कशाला अगदी ट्रक, बस यासारख्या वाहनांमध्येही अतिरिक्त साधनसामग्रीचा म्हणजे अॅक्सेसरीजचा वापर केला जातो. कार उत्पादनामध्ये सर्वसाधारण आवश्यक गरजांनुसार जी यंत्रणा वा ज्या वस्तू बसवलेल्या असतात, त्या सर्वांनाच पुरेशा असतात िकंवा आवडतात असे नाही. काहींना त्यामध्ये पर्यायही हवे असतात. यामुळेच वाहन उत्पादकांनी वाहनांमध्ये विशेष करून प्रवासी व वैयक्तिक वापराच्या वाहनांसाठी विविध अतिरिक्त अॅक्सेसरीज देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. तरीही त्या व्यतिरिक्त साधनसामग्री बसवली जाते. वाहन उद्योगामध्ये साधनसामग्रीच्या वैविध्यतेपायी आज अनेक प्रकारच्या वस्तुंची निर्मिती केली जाते, ग्राहकांकडून त्याला मागणीही असते. अशा या अॅक्सेसरीज वा वस्तू घेताना मात्र प्रत्येकाने चोखंदळपणाबरोबरच त्या वस्तुचा दर्जा, उपयुक्तता, टिकावूपणा, बदलत राहाण्याची इच्छा असली तरी त्यादृष्टीने असणारी  किंमत आदी विविध बाबी लक्षात घ्यायला हव्या. या अॅक्सेसरीजमध्ये काय येते तर वाहन ऑन रोड नोंदणीसाठी आरटीओकडे जी आवश्यक बाब लागते त्या व्यतिरिक्त असलेल्या अन्य सर्व सामग्री या खरे म्हणजे अतिरिक्तच म्हणाव्या लागतील. त्यात काही वस्तू सुविधा, आराम देणाऱ्या असतात तर काही वस्तू शोभेच्या बाहुलीप्रमाणे उपयोगाच्या असतात. काही वस्तू गाडीच्या मूळ वस्तूंचे संरक्षण करण्यासाठीही उपयोगी पडत असतात. 
यामध्ये सीट कव्हर्स, स्टिअरिंग कव्हर्स, अतिरिक्त हॉर्न, म्युझिक सिस्टिम, देवादिकांच्या मूर्ती, धार्मिक वैविध्यानुसार असलेल्या बाबी, एअर फ्रेशनर, डॅशबोर्ड कव्हर, फ्लोअरिंग लॅमिनेशन, रबर मॅट, अंतर्गत प्रकाशासाठी लागणारे एलईडी दिवे, हेडलॅम्प प्रखर लावता यावेत यासाठी कटआऊट, व्हॅक्यूम क्लीनर, प्लोअर, टायरमध्ये हवा भरण्यासाठी लागणारा पंप, हात पुसायचे कागद, गाडी सुंदर सजवण्यासाठी लागणारे स्टिकर्स व लाईट इत्यादी... अशा कितीतरी वस्तू वा साधनसामग्री अशी असते, की जी अनेकजण आवडीने खरेदी करतात. गाडीमध्ये त्याचा वापर होतो, कालांतराने त्या वस्तू फेकूनही दिल्या जातात. कार अॅक्सेसरीजच्या विविध वस्तुंचा बाजार आज खूप मोठा आहे. देशी व परदेशी अशा अनेक वस्तुंचे आकर्षण यामधून पडत असते. देशी वा परदेशी काही अशा काहीही वस्तू असल्या तरी त्यांची उपयुक्तता व गरज आणि आकर्षण हे प्रत्येकाचे वेगवेगळे असते. त्यामुळे त्या वस्तू घेताना त्यांची गरज असतेच का, असा प्रश्न सध्याच्या काळात तरी कोणालाच विचारून उपयोगाचा नाही. अशा प्रकारच्या अॅक्सेसरीज घेण्यासही हरकत नाही, पण त्याचा वापर होणार आहे का, त्या खरोखरच उपयोगाच्या आणि टिकावू आहेत का, त्या वस्तुंची सवय होणार नाही ना, नाहीतर भविष्यात त्यामध्ये बदल झाले तर त्या न मिळाल्याने काहींना वाहन चालवणेही कठीण झालेले दिसते. अशा वेगवेगळ्या अॅक्सेसरीजची महती व माहिती प्रत्येकाला असायला हवी. त्यासाठी असलेल्या बाजारात वा दुकानांमध्ये जाऊन त्या वस्तू खरेदी करण्याची हौसही अनेकांना  असते. पण काही वस्तू पाहिल्याविना खरेदी करू नयेत, इतके मात्र खरे.

Web Title: Variety of accessories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.