TVS-Bajaj ला मिळणार जोरदार टक्कर! Suzuki सादर करतेय इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 10:54 PM2021-11-11T22:54:22+5:302021-11-11T22:55:40+5:30

TVS आणि Bajaj या दोन भारतीय कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता Suzuki कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच सादर करणार आहे.

suzuki likely to launch electric scooter on november 18 is it burgman know all details | TVS-Bajaj ला मिळणार जोरदार टक्कर! Suzuki सादर करतेय इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा, डिटेल्स

TVS-Bajaj ला मिळणार जोरदार टक्कर! Suzuki सादर करतेय इलेक्ट्रिक स्कूटर; पाहा, डिटेल्स

Next

नवी दिल्ली: आताच्या घडीला देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. आगामी काळात इंधनदर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच भारतीय ग्राहक आता हळूहळू इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे वळू लागला आहे. यामुळे TVS आणि Bajaj या दोन भारतीय कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता Suzuki कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच सादर करणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर टेस्टिंग दरम्यान भारतीय रस्त्यांवर स्पॉटही झाली होती. 

सुझुकी लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतातील आपल्या लोकप्रिय स्कूटरपैकी एक सुझुकी बर्गमन नवीन इलेक्ट्रिक रुपात लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुझुकीने इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच करण्यासंदर्भात १८ नोव्हेंबर ही तारीख जाहीर केली आहे. मात्र, नेमकी कोणती स्कूटर कंपनी सादर करणार आहे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. 

Suzuki Burgman Electric लॉंच होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी १८ नोव्हेंबर रोजी जागतिक स्तरावर Suzuki Burgman Electric लाँच करणार आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सुझुकी बर्गमन इलेक्ट्रिक रुपात दिल्ली-एनसीआरमध्ये अनेकदा टेस्ट राइड दिसली आहे. सुझुकी बर्गमनची रचना सध्याच्या स्कूटरसारखीच आहे परंतु त्याच्या बॉडीमध्ये नवीन रंगांसह नवीन ग्राफिक्ससारखे काही बदल दिसू शकतात. टेस्ट राइड दरम्यान स्पॉट झालेल्या Suzuki Burgman मध्ये कंपनीने पुढील भागात पूर्वीप्रमाणेच मोठा ऍप्रन आणि हेडलाइटचा वापर केल्याचे पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, सुझुकीने या स्कूटरच्या पॉवर आणि रेंजबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी चांगल्या ड्रायव्हिंग रेंजसह ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणेल. सुझुकीची ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतक, TVS iQube, Ola Electric, Ather आणि Simple Energy सारख्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरशी थेट स्पर्धा करेल, असे सांगितले जात आहे. आगामी काळात Hero MotoCorp आणि Honda देखील त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहेत.
 

Web Title: suzuki likely to launch electric scooter on november 18 is it burgman know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.