रेनॉची क्विड ...क्रॉसओव्हरचा लूक असणारी छोटी हॅचबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 07:45 AM2017-09-25T07:45:23+5:302017-09-25T07:47:57+5:30

 रेनॉ इंडियाच्या क्विड या छोटेखानी कारला भारतीय बाजारपेठेत येऊन दोन वर्ष झाली. रेनॉ व निस्सान यांनी विकसित केलेली ही कार. क्विडची १ लीटर व ऑटोगीयरमध्येही आवृत्ती काढण्यात आली आहे.

Renoque Quad ... crossover look with a small hatcheck | रेनॉची क्विड ...क्रॉसओव्हरचा लूक असणारी छोटी हॅचबॅक

रेनॉची क्विड ...क्रॉसओव्हरचा लूक असणारी छोटी हॅचबॅक

ठळक मुद्दे प्रथम ७९९ सीसी ताकदीची व नंतर १००० सीसी मध्ये जास्त ताकदीची क्विड भारतीय बाजारपेठेत उतरवण्यात आली.कमी किंमतीत विशेष करून मध्यमवर्गीयांना आवडेल व शहरांमध्ये लोकांना चालवण्यास सुलभही असेल अशी रचना क्विडला दिली.

रेनॉ इंडियाच्या क्विड या छोटेखानी कारला भारतीय बाजारपेठेत येऊन दोन वर्ष झाली. रेनॉ व निस्सान यांनी विकसित केलेली ही कार. क्विडची १ लीटर व ऑटोगीयरमध्येही आवृत्ती काढण्यात आली आहे.

रेनॉ इंडियाने छोटी कार काढण्याचे मनात आणले काय व त्यांची कार भारतात चांगल्या रीतीने ग्राहकांपर्यंत पोहोचली काय, हे एक आश्चर्यच आहे. आतापर्यंत मोठ्या कार, एसयूव्हीशिवाय उत्पादन न करणाऱ्या रेनॉ कंपनीच्या एकंदर मोटारींकडे नजर टाकली तर हेच लक्षात येते. प्रथम ७९९ सीसी ताकदीची व नंतर १००० सीसी मध्ये जास्त ताकदीची क्विड भारतीय बाजारपेठेत उतरवण्यात आली. ऑटो गीयरचेही व्हर्जन सादर करण्यात आले असून क्विडचे हे दुसरे वर्ष आहे.

मुळात फ्रेंच कंपनी असलेल्या रेनॉचे अंतर्गत रचना, आरेखन हे सुरेखच होते, क्विडमध्येही त्यांनी अंतर्गत रचना आकर्षक केल्याने व कमी किंमतीत विशेष करून मध्यमवर्गीयांना आवडेल व शहरांमध्ये लोकांना चालवण्यास सुलभही असेल अशी रचना क्विडला दिली. त्यामुळे भारतीय ग्राहकांना ती न आवडली असती तरच नवल. सौंदर्य, भारतीय ग्राहकांचा मोठ्या गाड्यांव्यतिरिक्त असलेला वर्गही ओळखला, नवी रंगसंगती, सुविधा व स्टायलीश लूक हे दिले. एकंदर चार श्रेणींमध्ये ही विविध कमी अधिक सुविधांसह आहे.

०.८ ली. व १ लीटर क्विडची तांत्रिक वैशिष्ट्ये
इंधन - पेट्रोल
इंजिन- ७९९/ ९९९ सीसी (०.८ /१ ली.), ३ सिलिंडर, १२ व्हॉल्व, एमपीएफआय पेट्रोल, बीएस ४,/ १ लीटर इंजिन ६७ बीएचपी
कमाल ताकद - ५३.३ बीएचपी @ ५६७८ आरपीएम/ ६७ बीएचपी@ ५५०० आरपीएम
कमाल टॉर्क - ७२ एनएम @४३८६ आरपीएम / ९१ एनएम @४२५० आरपीएम
गीयर्स - एकूण पाच. हाताने टाकण्याचे. ऑटो गीयरमध्येही वरच्या श्रेणीत उपलब्ध
लांबी, रुंदी व उंची (सर्व मिमि) - ३६७९/ १५७९/ १४७८
व्हीलबेस - २४२२ मी
टर्निंग रेडियस - ४.९ मी
ग्राऊंड क्लीअरन्स - १८० मिमि.
बूट स्पेस - ३०० ली.
ब्रेक - फ्रंट व रेअर - डिस्क व ड्रम
इंधन टाकी क्षमता - २८ लीटर
टायर व व्हील - १५५/८० आर १३ स्टील रिम व्हील आकार १३ इंच. ट्यूबलेस रॅडिअल टायर्स
कर्ब वेट ६९९ किलो.
(१ लीटर इंजिनामध्ये ऑटो गीयरमध्येही (AMT)उपलब्ध)

Web Title: Renoque Quad ... crossover look with a small hatcheck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन