Hyundai Venue Executive: ह्युंदाईने बाजारात आणली नवीन SUV, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 07:53 PM2024-03-05T19:53:41+5:302024-03-05T19:53:59+5:30

Hyundai Venue Executive: व्हेन्यूच्या नवीन मॉडेलमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आली आहेत.

Hyundai Venue Gets New Executive Variant At Rs 10 Lakh | Hyundai Venue Executive: ह्युंदाईने बाजारात आणली नवीन SUV, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

Hyundai Venue Executive: ह्युंदाईने बाजारात आणली नवीन SUV, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

नवी दिल्ली : ह्युंदाईने (Hyundai) भारतीय बाजारपेठेत व्हेन्यूचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. या नवीन मॉडेलचे नाव व्हेन्यू एक्झिक्युटिव्ह (Venue Executive) असून किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. लेटेस्ट एसयूव्ही फक्त 1.0 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनच्या पॉवरसह मिळणार आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

ह्युंदाई व्हेन्यू एक्झिक्युटिव्ह व्हेरिएंटची (Hyundai Venue Executive variant) एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. त्याच इंजिनसह येणाऱ्या व्हेन्यू एस (ओ) व्हेरिएंटच्या तुलनेत एक्झिक्युटिव्ह व्हेरिएंट 1.75 लाख रुपयांनी स्वस्त आहे. व्हेन्यू एक्झिक्युटिव्हच्या आगमनानंतर, लोकांना टर्बो-पेट्रोल इंजिनसह सुसज्ज एसयूव्ही खरेदी करणे सोपे होईल. यात 16-इंच ड्युअल स्टाइल व्हील, फ्रंट ग्रिलवर गडद क्रोम आणि टेलगेटवर 'एक्झिक्युटिव्ह' बॅज दिसून येईल. याशिवाय, एसयूव्हीमध्ये रुफ रेल आहे, ज्यामुळे ती वेगळी आणि शानदार दिसते.

फीचर्स
व्हेन्यूच्या नवीन मॉडेलमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये टू-स्टेप रिक्लाइनिंग आणि 60:40 स्प्लिट-फोल्डिंग रीअर सीट्स, 8.0-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. मात्र, एस (ओ) व्हेरिएंटमध्ये मिळणारा रिअर कॅमेरा, एलईडी लाइट्स आणि डीआरएल, ओआरवीएम-माउंटेड इंडिकेटर्स, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, सनरूफ आणि एक रिअर पार्सल ट्रे सारखी फीचर्स व्हेन्यू एक्झिक्युटिव्हमध्ये मिळणार नाहीत.

कोणत्या कारला देऊ शकते टक्कर?
व्हेन्यू एक्झिक्युटिव्ह आणि एस (ओ) टर्बो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख ते 11.86 लाख रुपये आहे. या किंमतीसह व्हेन्यू मॉडेल रेनॉल्ट किगर टर्बो (Renault Kiger Turbo) आणि निसान मॅग्नाइट टर्बो (Nissan Magnite Turbo) कारला टक्कर देऊ शकते.  Renault Kiger Turbo ची एक्स-शोरूम किंमत 9.30 लाख ते 11.23 लाखांच्या दरम्यान आहे. तर issan Magnite Turbo ची एक्स-शोरूम किंमत 8.25  लाख ते 11.27 लाखांपर्यंत आहे.
 

Web Title: Hyundai Venue Gets New Executive Variant At Rs 10 Lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.