Honda CB750 Hornet: एकच नंबर! ६ गिअरबॉक्सवाली स्पोर्ट्स बाइक आली, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:21 PM2022-10-06T17:21:53+5:302022-10-06T17:22:56+5:30

Honda CB750 Hornet Price: Honda ने शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट फिचर्ससह आपली स्पोर्टिंग बाइक CB750 Hornet लाँच केली आहे. होंडाच्या नव्या बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊयात.

honda cb750 hornet unveiled this honda sports bike packed with 6 gearbox | Honda CB750 Hornet: एकच नंबर! ६ गिअरबॉक्सवाली स्पोर्ट्स बाइक आली, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या...

Honda CB750 Hornet: एकच नंबर! ६ गिअरबॉक्सवाली स्पोर्ट्स बाइक आली, किंमत अन् फिचर्स जाणून घ्या...

Next

दुचाकी उत्पादक Honda गेल्या अनेक महिन्यांपासून टीझर जारी करत होती आणि अखेर कंपनीने आपली नवीन Honda CB750 Hornet बाईक लॉन्च केली आहे. महत्त्वाच्या फिचर्सबाबत बोलायचं झालं तर, Honda बाइकमध्ये कंपनीने 755 cc पॅरलल-ट्विन इंजिन दिलं आहे जे 9,500 rpm वर 92hp आणि 7000rpm वर 74.4Nm टॉर्क जनरेट करते. या Honda बाईकमध्ये कंपनीला चार रायडर मोडसह व्हील कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, ऑप्शनल बाय-डायरेक्शनल क्लिकशिफ्टर आणि इंजिन ब्रेक कंट्रोल यासारखे फीचर्स मिळतील. या बाईकच्या फीचर्स आणि किंमतीची सविस्तर माहिती घेऊयात.

इंजिन आणि गिअरबॉक्स
755cc पॅरलल-ट्विन इंजिनद्वारे ही बाईक 270-डिग्री फायरिंग ऑर्डरचा वापर करून V-ट्विन इंजिनचा आवाज निर्माण करते. या बाईकमधील इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेलं आहे जे स्लिप/असिस्ट क्लचसह येतं आणि तुमची इच्छा असल्यास तुम्ही ते ऑप्शनल बायडायरेक्शन क्विकशिफ्टरसोबतही जोडू शकता.

इंधन क्षमता आणि फिचर्स
या बाइकची १५.३ लीटर इंधन क्षमता आहे. तर एकूण वजन १९० किलो इतकं आहे. बाइकमध्ये कंपनीनं ५ इंचाचा फूल कलर टीएफटी डिस्प्ले दिला गेला आहे. सोबतच स्पोर्टिंग बाइकमध्ये चार पावर मोड्स देखील देण्यात आले आहेत. पहिला स्पोर्ट्स, दुसरा स्टँडर्ड, तिसरा रेन आणि चौथा यूजर जो पूर्णपणे कस्टमाइज थिमवर आहे. Honda ने आपल्या CB750 Hornet मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ सपोर्ट आणि Honda स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सारखे फीचर्स दिले आहेत.

Honda CB750 Hornet Price  आणि रंग
युरोपियन मार्केटमध्ये या बाईकची किंमत 6,999 युरो (जवळपास 6.50 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. ग्लेअर व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक, गोल्डफिंच यलो आणि इरिडियम ग्रे मेटॅलिक अशा चार वेगवेगळ्या रंगांमध्ये ही बाईक ग्राहकांसाठी आणण्यात आली आहे.

जागतिक बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर लवकरच ही बाईक भारतीय बाजारपेठेतही दाखल होऊ शकते आणि जागतिक किंमत पाहता, होंडाची ही बाईक भारतीय बाजारपेठेत 7 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते. हा फक्त एक अंदाज व्यक्त आहे आणि भारतीय बाजारात बाइक लॉन्च झाल्यावरच अधिकृत किंमत उघड होईल.

Web Title: honda cb750 hornet unveiled this honda sports bike packed with 6 gearbox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.