कारसारख्या फीचर्ससह लाँच होणार 'या' 3 स्कूटर, चावीशिवाय होतील स्टार्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:00 AM2023-01-25T11:00:42+5:302023-01-25T11:01:18+5:30

H-Smart Scooters : होंडाच्या इतर स्कूटरमध्ये देखील स्मार्ट की आणि OBD2 सारखी फीचर्स आणली जातील, असे कंपनी म्हटले आहे.

Honda Activa H-Smart: Scooter with car-like features; activa 125, grazia 125 and dio scooters best scooty for girls | कारसारख्या फीचर्ससह लाँच होणार 'या' 3 स्कूटर, चावीशिवाय होतील स्टार्ट!

कारसारख्या फीचर्ससह लाँच होणार 'या' 3 स्कूटर, चावीशिवाय होतील स्टार्ट!

googlenewsNext

नवी दिल्ली : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (Honda Motorcycle and Scooter India)नुकतीच नवीन अॅक्टिव्हा (Activa) भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ही अॅक्टिव्हा आता एका स्मार्ट चावी (की) आणि OBD2 सह येते. याचा अर्थ असा की उत्सर्जन नियमांनुसार, स्कूटर आता बीएस-6 स्टेज-2 नुसार तयार करण्यात आली आहे.

होंडाच्या इतर स्कूटरमध्ये देखील स्मार्ट की आणि OBD2 सारखी फीचर्स आणली जातील, असे कंपनी म्हटले आहे. जर सर्व काही ठीक राहिल्यास, उर्वरित लाइन-अप जूनपर्यंत अपडेट केले जाईल. होंडाच्या इतर स्कूटरमध्ये Activa 125, Grazia 125 आणि Dio यांचा समावेश आहे. याचा अर्थ असा की Activa 125, Grazia 125 आणि Dio या नवीन स्मार्ट व्हेरिएंटमध्ये सादर केले जाऊ शकतात, ज्या स्मार्ट की आणि एच-स्मार्ट फीचर्ससह तयार असतील. याशिवाय, त्यांना बीएस-6 स्टेज-2 अनुरूप इंजिन देखील मिळतील.

स्मार्ट फाइंड : ही एक आन्सर बॅक सिस्टिम आहे, ज्यामध्ये स्मार्ट चावी स्कूटर सहजपणे शोधण्यात मदत करते. जेव्हा स्मार्ट कीवर आन्सर बॅक बटन दाबले जाते, तेव्हा स्कूटर सर्व 4 ब्लिंकर्स दोनदा ब्लिंक करेल आणि स्वतःला शोधण्यात मदत करेल.

स्मार्ट अनलॉक : स्मार्ट की सिस्टिम ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, जी फिजिकल चावी न वापरता वाहन लॉक आणि अनलॉक करणे सोपे करते. बटण दाबल्यानंतर 20 सेकंदांपर्यंत सिस्टीम कोणतीही अॅक्टिव्हिटी करत नसल्यास, स्कूटर आपोआप इनअॅक्टिव्ह होते.

स्मार्ट स्टार्ट : जर स्मार्ट की स्कूटरच्या 2 मीटर रेंजच्या आत असेल, तर रायडर लॉक मोडवर नोबला इग्निशन पोझिशनमध्ये वळवून आणि की न काढता स्टार्ट बटण दाबून लॉक मोडवर सहजपणे वाहन सुरू करू शकतो.

स्मार्ट सेफ : अ‍ॅक्टिव्हा मॅप्ड स्मार्ट ECU ने तयार आहे, जे ECU आणि स्मार्ट की यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मॅचिंगद्वारे सेफ्टी फीचर्स म्हणून कार्य करते. त्यामुळे स्कूटर चोरणे अशक्य आहे. स्मार्ट कीमध्ये इमोबिलायझर सिस्टीम असते, इंजिन इतर कोणत्याही कीने सुरू करता येत नाही.
 

Web Title: Honda Activa H-Smart: Scooter with car-like features; activa 125, grazia 125 and dio scooters best scooty for girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.