600Km रेंज अन् फक्त 31 मिनिटांत फूल चार्ज; भारतात लॉन्च झाली 'ही' दमदार EV कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 06:56 PM2023-08-18T18:56:48+5:302023-08-18T18:58:12+5:30

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्यामुळे कंपन्या नवनवीन EV लॉन्च कत आहेत.

Audi Q8 e-tron: 600Km range and full charge in just 31 minutes; audis Powerful EV car launched in India | 600Km रेंज अन् फक्त 31 मिनिटांत फूल चार्ज; भारतात लॉन्च झाली 'ही' दमदार EV कार

600Km रेंज अन् फक्त 31 मिनिटांत फूल चार्ज; भारतात लॉन्च झाली 'ही' दमदार EV कार

googlenewsNext

Audi Q8 e-tron: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्यामुळे कंपन्याही आपल्या नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या मार्केटमध्ये लॉन्च करत आहे. जर्मनीतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी ऑडीने (Audi) आज नवीन इलेक्ट्रिक कार ऑडी Audi Q8 e-tron लॉन्च केली. आकर्षक लुक आणि पॉवरफुल बॅटरी पॅकने सुसज्ज असलेल्या या कारचे स्पोर्टबॅक व्हर्जनही लॉन्च करण्यात आले आहे. एकूण 4 व्हेरिएंटमध्ये येणाऱ्या या कारचे बेस मॉडेलची किंमत 1.14 कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. कंपनीने कारचे अधिकृत बुकिंग सुरू केले आहे, ज्यासाठी ग्राहकांना 5 लाख रुपये जमा करावे लागतील.


 
ऑडी Q8 ई-ट्रॉन दोन वेगवेगळ्या बॉडी टाईपमध्ये ऑफर केली आहे. एक एसयूव्ही व्हर्जन आणि दुसरे स्पोर्टबॅक व्हर्जन आहे. ही कार एकूण 9 एक्सटीरिअर आणि तीन इंटिरीअर शेड्समध्ये उपलब्ध असेल. एक्सटीरिअरमध्ये मडेरा ब्राऊन, क्रोनोस ग्रे, ग्लेशियर व्हाइट, मायथोस ब्लॅक, प्लाझ्मा ब्लू, सोनेरा रेड, मॅग्नेट ग्रे, सियाम बेज आणि मॅनहॅटन ग्रे रंग मिळतील. इंटिरीअर थीममध्ये ओकापी ब्राउन, पर्ल बेज आणि ब्लॅक रंग मिळेल. 

Audi Q8 e-tron व्हेरिएंटच्या किमती:

ऑडी Q8 50 ई-ट्रॉन रु 1,13,70,000
ऑडी Q8 50 स्पोर्टबॅक ई-ट्रॉन रु 1,18,20,000
ऑडी Q8 55 ई-ट्रॉन रु 1,26,10,000
ऑडी Q8 55 स्पोर्टबॅक ई-ट्रॉन रु 1,30,60,000

कशी आहे Audi Q8 e-tron: 
कारमध्ये कन्सोलवर ड्युअल-टचस्क्रीन सेटअपसह, 10.1-इंच इन्फोटेन्मेन्ट टचस्क्रीन आणि HVAC नियंत्रणांसाठी 8.6-इंच स्क्रीन आहे. यात ऑडीचे व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, 16-स्पीकर बँग आणि ओलुफसेन स्पीकर सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमेरासह ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.

बॅटरी आणि परफॉर्मन्स:
कंपनीने ऑडी Q8 ई-ट्रॉन दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केली आहे. एका व्हेरियंटमध्ये 95kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो जो 340bhp पॉवर आणि 664Nm टॉर्क जनरेट करतो. तर दुसरा बॅटरी पॅक 114kWh चा आहे, जो 408bhp पॉवर जनरेट करतो. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जमध्ये 600 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. 170 kW क्षमतेच्या DC फास्ट चार्जरच्या मदतीने बॅटरी अवघ्या 31 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते.

 

Web Title: Audi Q8 e-tron: 600Km range and full charge in just 31 minutes; audis Powerful EV car launched in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.