जिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:19 AM2017-07-22T00:19:32+5:302017-07-22T00:21:37+5:30

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Scarcity of medicines in District Hospital | जिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा

जिल्हा रुग्णालयात औषधींचा तुटवडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागातील हजारो रुग्ण दररोज उपचार घेण्यासाठी येतात. या रुग्णांवर उपचार केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडूनच औषधींचा पुरवठा केला जातो. मात्र मागील एक महिन्यापासून रुग्णालयामध्ये औषधींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार केल्यानंतर आवश्यक ती औषधी लिहून देताना डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना अ‍ॅन्टीबायोटिक औषधी द्यावी लागते. मात्र याच औषधींचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे ही औषधी रुग्णांना बाहेरुन विकत घ्यावी लागते. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे एक आठवडाभर पुरेल इतकीच औषधी शिल्लक आहे. टॉक्झीन, अ‍ॅम्फ्यूल ही अ‍ॅन्टीबायोटिक औषधी उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणी भेडसावत आहेत. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.जावेद अथर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा हायर अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचाच तुटवडा असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे २५० ते ३०० औषधी उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालयाला प्रत्येक आठवड्याला सुमारे ५०० औषधींची आवश्यकता असते. त्याचा अर्धाच साठा उपलब्ध आहे. दरम्यान, मुबलक औषधी पुरवावीत, अशी मागणी वरिष्ठांकडे नोंदविली आहे. येत्या काही दिवसांत ही औषधी प्राप्त होतील, असे त्यांनी सांगितले. तसेच सद्यस्थितीला शहरातील खाजगी डॉक्टर्स आणि मेडिकल असोसिएशनशी संपर्क केला असून सामाजिक बांधिलकी राखत अ‍ॅन्टीबायोटिक औषधींचा पुरवठा करावी, अशी विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Scarcity of medicines in District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.