लोखंडे भूषवणार भारतीय संघाचे प्रशिक्षकपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:09 AM2019-03-19T00:09:45+5:302019-03-19T00:10:43+5:30

औरंगाबाद येथील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रातील जिम्नॅस्टिक प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रामकृष्ण लोखंडे यांची दोहा येथे २0 ते २३ मार्चदरम्यान होणाऱ्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी रामकृष्ण लोखंडे नुकतेच रवाना झाले आहेत.

Lokhande Bhushav is the coach of the Indian team | लोखंडे भूषवणार भारतीय संघाचे प्रशिक्षकपद

लोखंडे भूषवणार भारतीय संघाचे प्रशिक्षकपद

googlenewsNext
ठळक मुद्देजिम्नॅस्टिक विश्वचषक : दोहा येथे स्पर्धा

औरंगाबाद : औरंगाबाद येथील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रातील जिम्नॅस्टिक प्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रामकृष्ण लोखंडे यांची दोहा येथे २0 ते २३ मार्चदरम्यान होणाऱ्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी रामकृष्ण लोखंडे नुकतेच रवाना झाले आहेत.
या निवडीविषयी क्रीडा मंत्रालय व भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाचे पत्र रामकृष्ण लोखंडे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे रामकृष्ण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथील रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी ‘खेलो इंडिया’च्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत पदकांची लूट केली होती.
विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघात योगेश्वरसिंग (सेनादल), उज्ज्वल नायडू (कर्नाटक) यांचा समावेश आहे.
मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी या गावच्या रामकृष्ण लोखंडे यांच्या या निवडीबद्दल साई केंद्राचे विभागीय संचालक राधिका श्रीमन, पश्चिम विभागीय केंद्राच्या संचालक सुश्मिता जोत्सी, वीरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक अजितसिंग राठोड, भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाचे सचिव रणजित वसावा, उपाध्यक्ष कौशीक बिडीवाला, रियाज भाटी, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी, प्रभारी क्रीडा उपसंचालक अशोक गिरी, प्रशिक्षक पिंकी देब, तनुजा गाढवे, संतोष कुन्नपाडा, अ‍ॅड. संकर्षण जोशी, सागर कुलकर्णी, विशाल देशपांडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Lokhande Bhushav is the coach of the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.