जगदगुरूंची अड्ड पालखी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:02 AM2017-09-07T01:02:13+5:302017-09-07T01:02:13+5:30

श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व विरशैव समाज परळीच्या वतीने बुधवारी सायंकाळी केदारपीठाचे श्रीश्रीश्री १००८ जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची परळी शहरातून अड्ड पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली.

Jagadguru Add Palkhi rally | जगदगुरूंची अड्ड पालखी मिरवणूक

जगदगुरूंची अड्ड पालखी मिरवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व विरशैव समाज परळीच्या वतीने बुधवारी सायंकाळी केदारपीठाचे श्रीश्रीश्री १००८ जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची परळी शहरातून अड्ड पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. यामध्ये महिलांची लक्षणिय उपस्थिती होती. केदारपीठ जगदगुरूंचा विजय असो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, श्री संत मन्मथस्वामी महाराज की जय च्या जयघोषाने परळी दुमदुमली होती.
हिमवत केदारपीठ उखीमठ, जि.रूद्रप्रयाग (उत्तराखंड) येथील श्री केदारनाथ रावल पदवी विभूषित वैराग्य सिंहासनाधिश्वर श्रीश्रीश्री १००८ जगदगुरू श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची संगीतमय इष्टलिंग महापूजा व धर्म जागृती, धर्मोपदेश येथील वैजनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात बुधवारी आयोजित केली होती.
विद्यानगर भागातील शंभू महादेव मंदिरापासून जगदगुरूंची अड्ड पालखी काढण्यात आली. शिवाजी चौक, बसस्टँड, रेल्वे स्टेशन रोड, मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, गणेशपार रोड, नांदूरवेस, अंबेवेस मार्गे वैद्यनाथ मंदिरात पालखी आली. भक्तांनी रांगोळ्या काढून पालखीचे भक्तांनी स्वागत केले. यावेळी पुष्पवृष्टीही करण्यात आली.
या सोहळ्यात सर्वश्री ष.ब्र.१०८ गुरवर्य तपोरत्न प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर, शंभुलिंग शिवाचार्य महाराज, अंबाजोगाई, श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, सिंगणापूर, विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, चन्नबस्व शिवाचार्य महाराज बर्दापूर यांच्यासह इतर शिवाचार्य, राजेश देशमुख, दत्ताप्पा ईटके, नगराध्यक्षा सरोजनी सोमनाथअप्पा हालगे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Jagadguru Add Palkhi rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.