जिल्हा परिषदेची विकतच्या पाण्यावर तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:28 AM2019-05-10T00:28:15+5:302019-05-10T00:29:00+5:30

टंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाºया जिल्ह्याचे मिनीमंत्रालय मानले जाणाऱ्या जिल्हा परिषदेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

Zilla Parishad's thirst for buying water | जिल्हा परिषदेची विकतच्या पाण्यावर तहान

जिल्हा परिषदेची विकतच्या पाण्यावर तहान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : टंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील लाखो ग्रामस्थांची तहान भागविणाºया जिल्ह्याचे मिनीमंत्रालय मानले जाणाऱ्या जिल्हा परिषदेलापाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भीषण आहे. ग्रामस्थांची तहान भागवण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या जिल्हा परिषदेसहीपाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. आता ही परिस्थिती भयावह झाली आहे. झेडपीचे अध्यक्ष वगळता, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, वनिता पाल, सुशीला कुकडे, बळवंत वानखडे आदींच्या दालनात पिण्यासोबतच वापरासही पाणी नसल्याने प्रसाधनगृहाला टाळे लागले आहे. पदाधिकारी कार्यालयात हजर असताना संबंधित परिचराकडून पिण्यासाठी बाहेरील पाणेरीवरून बॉटल बोलवतात. प्रसाधनगृहात वापरण्यासाठीही बाहेरून पाणी आणावे लागत आहे. काही विभागातील कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्याची कॅन बोलवावी लागत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उकाड्यापासून बचावासाठी अधिकाऱ्यांच्या दालनात लावलेल्या कुलरमध्येही पाणी राहत नसल्याने पंख्याची हवा घ्यावी लागत आहे. एका पदाधिकाºयांच्या दालनात प्रसाधनगृहासमोर तर 'प्रसाधनगृहाचा वापर करण्यापूर्वी कृपया पाणी असल्याची खात्री करावी' अशी सूचनाच लिहिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईचे निवारण करणाºया जिल्हा परिषदेतील पाणी टंचाई केव्हा दूर होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेत पाणीटंचाईची समस्या भेडसावत असताना यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्यात. मात्र आचारसंहिता व अन्य कारणांमुळे लक्ष दिले नाही. त्यामुळेच झेडपीत पाण्याची कुत्रिम टंचाई आहे. ती तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करू.
- नितीन गोंडाणे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेत पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बोअर करण्यात आले. मात्र त्यातील उद्भव कमी आहे. त्यामुळे लवकरच पाण्याची समस्या सोडविण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील.
- मनीषा खत्री,
मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Zilla Parishad's thirst for buying water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.