पश्चिम विदर्भात यंदा ३२ लाख हेक्टरमध्ये खरीपाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 05:37 PM2018-04-27T17:37:22+5:302018-04-27T17:37:41+5:30

यंदा सरासरी इतका पाऊस राहणार असल्याचे भाकित ‘आयएमडी’ द्वारा वर्तविण्यात आले, त्यामुळे खरीप हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कृषी विभागाद्वारा अमरावती विभागात यंदा ३२ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

This year, the estimated area of crop is ​​32 lakh hectares in Vidarbha | पश्चिम विदर्भात यंदा ३२ लाख हेक्टरमध्ये खरीपाचा अंदाज

पश्चिम विदर्भात यंदा ३२ लाख हेक्टरमध्ये खरीपाचा अंदाज

Next
ठळक मुद्देसहा लाख क्विंटल बियाण्यांची गरजकृषी विभागाद्वारा प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा सरासरी इतका पाऊस राहणार असल्याचे भाकित ‘आयएमडी’ द्वारा वर्तविण्यात आले, त्यामुळे खरीप हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कृषी विभागाद्वारा अमरावती विभागात यंदा ३२ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यानुसार किमान ५.८० लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. याव्यतिरिक्त २३,३०० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार आहे.
अमरावती जिल्ह्यात सात लाख २६ हजार हेक्टर, बुलडाणा जिल्ह्यात सात लाख १४ हजार, वाशिम जिल्ह्यात चार लाख सहा हजार व यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नऊ लाख हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र राहण्याची शक्यता आहे. यासाठी खासगी व सार्वजनिक क्षेत्रातून एकूण ५ लाख ८० हजार ४५६ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १,५५,५३८ क्विंटल, अकोला जिल्ह्यात ८६,२९०, वाशिम जिल्ह्यात एक लाख, अमरावती १,२१,९७० व यवतमाळ जिल्ह्यात १,१५,६१२ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये २ लाख ५५ हजार ६७६ क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ३१,६८०, अकोला जिल्ह्यात ३५,८६८, वाशिम ५१,७२६, अमरावती ६६,३९० व यवतमाळ जिल्ह्यात ७०,०१२ क्विंटल बियाणे उपलब्ध करणार आहे.

बीटीच्या ४६.५० लाख पाकिटांची मागणी
यंदाच्या खरिपात ४६ लाख ५० हजार बीटी बियाण्यांची पाकिटे लागणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात ८,११,५००, अकोला ६,०५,००० वाशिम १,२६,०००, अमरावती ९३,७,५०० व यवतमाळ जिल्ह्यात २१,७०,००० पाकीटे लागणार आहे. ही सर्व बीजी-२ ची आहेत तर बीजी-१ ची ८,१२३ पाकिटांची मागणी आहे. मागील वर्षी १०,२६,२७१ हेक्टर पेरणी होते त्यातुलनेत यंदा ९,३२,५०० हेक्टर पेरणीक्षेत्र राहणार आहे.

यंदा ६.६४ लाख मे.टन खतांची मागणी
यंदाच्या खरिपासाठी ६,६४,७८५ मे.टन रासायनिक खतांची मागणी आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात २,०७,९७३ मे.टन, अकोला १०,७,०००, वाशिम ४४,०००, अमरावती १,४०,००० व यवतमाळ जिल्ह्यात १,६५,८१२ मे.टन खतांचा ामावेश आहे. सर्वाधिक युरीया २,१४,९०९ मे.टन, डीएपी १,१०,६८०, एमओपी ३८,४५३ व एसएसपी ८९,०९५ मे.टन खतांची मागणी आहे.

Web Title: This year, the estimated area of crop is ​​32 lakh hectares in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती