शुल्कवाढीविरुद्ध ट्रक चालक-मालक रस्त्यावर

By admin | Published: February 1, 2017 12:08 AM2017-02-01T00:08:46+5:302017-02-01T00:08:46+5:30

केंद्रीय मोटर नियम १९८९ च्या नियमातील विविध शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रेती गिट्टी बोल्डर ट्रक चालक-मालक महासंघाने लक्षवेधी आंदोलन केले.

Truck driver-owner | शुल्कवाढीविरुद्ध ट्रक चालक-मालक रस्त्यावर

शुल्कवाढीविरुद्ध ट्रक चालक-मालक रस्त्यावर

Next

लक्षवेधी आंदोलन : जिल्हाकचेरीसमोर रास्तारोको
अमरावती : केंद्रीय मोटर नियम १९८९ च्या नियमातील विविध शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रेती गिट्टी बोल्डर ट्रक चालक-मालक महासंघाने लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रक आणून काहीवेळ रास्तारोको केला. दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेऊन विविध मागणीचे निवेदन केंद्रीय दळणवळण मंत्री व मुख्यमंत्र्यांना यांना पाठविण्यात आले.
प्रमुख मागण्यांमध्ये आतापर्यंत परमीट शुल्क २०० रूपये होते. ते आता १२०० रूपये करण्यात आले, ते कमी करण्यात यावे, टीओ शुल्क तीनशे रूपयावरून दीड हजार रूपये करण्यात आले ते रद्द करावे, एच.पी.ए शुल्क शंभर रूपयावरून ३ हजार रूपये करण्यात आले. वाहन नोंदणी तीच चाकी ,चार चाकी, हलके व मध्यम मालवाहू, प्रवासी वाहन आधी शुल्क दोनशे, तीनशे रूपयांवरून एक हजार रूपये करण्यात आले आहे. ही दरवाढ वाहनधारकांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे सवर शुल्क वाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी ट्रक चालक, मालकांनी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी अध्यक्ष सुनील रामटेके, सचिव रवींद्र लोणारे, कोषाध्यक्ष समीर जिलानी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Truck driver-owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.