शिवछत्रपती पुरस्कार विजेती दीक्षा गायकवाड हिची सुवर्णझेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:58 PM2019-03-12T12:58:46+5:302019-03-12T12:59:26+5:30

राष्ट्रीय भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेती तथा अमरावती सीआयएसएफ पोलीस फोर्सचे नेतृत्व करणारी दीक्षा प्रदीप गायकवाड हिने भारोत्तोलनमध्ये महिलांच्या ५९ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकाविले.

Shivchhatrapati prize winner Diksha Gaikwad wins gold medal in weight lifting | शिवछत्रपती पुरस्कार विजेती दीक्षा गायकवाड हिची सुवर्णझेप

शिवछत्रपती पुरस्कार विजेती दीक्षा गायकवाड हिची सुवर्णझेप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजस्थानातील जयपूर येथे २८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान राष्ट्रीय भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शिवछत्रपती पुरस्कार विजेती तथा अमरावती सीआयएसएफ पोलीस फोर्सचे नेतृत्व करणारी दीक्षा प्रदीप गायकवाड हिने भारोत्तोलनमध्ये महिलांच्या ५९ किलो वजनगटात एकूण १९३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.
राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील राज्य पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, राष्ट्रीय पोलीस दल, राष्ट्रीय राखीव पोलीस दल, लोहमार्ग पोलीस दल, रेल्वे पोलीस फोर्स, सी.आय.एस.एफ, आय.टी.बी.पी. आदींनी सहभाग घेतला होता. दीक्षा गायकवाड हिच्या सुवर्णयशाने सीआयएसएफ पोलीस फोर्स नव्हे, तर अमरावती शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच प्रशिक्षकांना देते. दीक्षाने देश, राज्य तसेच परदेशातसुद्धा अनेक पदके जिंकली. त्या योगदानासाठी तिने यंदाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारदेखील पटकाविला.

Web Title: Shivchhatrapati prize winner Diksha Gaikwad wins gold medal in weight lifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.