शहीद मुन्नाच्या आई-वडिलांची रक्ततुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 09:34 PM2019-01-11T21:34:56+5:302019-01-11T21:36:01+5:30

शहीद मुन्ना सेलुकर यांच्या माता-पित्यांची २१०० दात्यांनी रक्तदान करून रक्ततुला करण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील हजारो नागरिकांनी महोत्सवात उपस्थिती दर्शविली.

Shaheed Munna's parents' blood vessel | शहीद मुन्नाच्या आई-वडिलांची रक्ततुला

शहीद मुन्नाच्या आई-वडिलांची रक्ततुला

Next
ठळक मुद्देस्वाभिमान कृषी महोत्सव : महाशिबिरात २१०० दात्यांचे रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहीद मुन्ना सेलुकर यांच्या माता-पित्यांची २१०० दात्यांनी रक्तदान करून रक्ततुला करण्यात आली. शुक्रवारी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील हजारो नागरिकांनी महोत्सवात उपस्थिती दर्शविली.
शेतकऱ्यांच्या हितार्थ युवा स्वाभिमान पार्टीतर्फे स्थानिक सायंसकोर मैदानात कृषी महोत्सवाला गुरुवारी प्रारंभ झाला. युवा स्वाभिमान पार्टीचे संयोजक नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्या संकल्पनेतून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेतीपयोगी साहित्य विक्रीचे स्टॉल लागले आहेत. शुक्रवारी सकाळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आ. राणा व युवा स्वाभिमान पार्टीच्या प्रेरणास्त्रोत नवनीत यांनी १५०० बॉटल्सचा संकल्प केला होता. मात्र, नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन हजार १०० बॉटल्स रक्त संकलन झाले. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तपेढी जनसंपर्कप्रमुख उमेश आगरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
यावेळी चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील रहिवासी बिहार रेजिमेंटवर हिमाचल प्रदेशात कार्यरत असताना शहीद झालेले जवान मुन्ना सेलुकर यांच्या माता रतनू व पिता पुनाजी सेलुकर यांची रक्ततुला करून खºया अर्थाने मुन्ना सेलुकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सात ब्लड बँकांनी केले रक्त संकलन
सायंसकोर मैदानात आयोजित रक्तदान महाशिबिरात हजारो नागरिकांचा सहभाग लाभणार असल्याची खात्री आ. रवि राणा यांना होती. त्यामुळे वाढत्या गर्दीत रक्त संकलनाच्या कार्यात दिरंगाई होऊ नये, यासाठी त्यांनी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, दत्ता मेघे आयुर्विज्ञान महाविद्यालय व रुग्णालय वर्धा, श्री बालाजी ब्लड बँक, दारा ब्लड बँक अमरावती, डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीच्या रक्तपेढीला आमंत्रित केले होते.
हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी
जिल्ह्यातील विविध तालुक्यांसह शहरातील हजारो नागरिकांनी महाशिबिरात आरोग्य तपासणी करवून घेतली. यावेळी सर्व प्रकारचे रोगनिदान करण्यासाठी इर्विन रुग्णालय, डॉ.पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, दत्ता मेघे आयुर्विज्ञान रुग्णालय, वर्धा, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथून विविध आजाराचे सर्जन, रुग्णालयासह विविध पीएचसीतील डॉक्टरांसह परिचारिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
प्रमाणपत्राचे वितरण, मातांचा सन्मान
कार्यक्रमात चांदूर रेल्वे येथे शेतात मृत्यू पावलेल्या सतिश शरदराव मडावी यांची माता, जमावाने हल्ला करुन मृत्यू पावलेले अचलपूरचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शहीद शांतीलाल पटेल यांच्या पत्नीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बुधिया बब्बू अजमेरीया (मेळघाट महिला दूध उत्पादन सहकारी संस्था, चिचखेड), श्रीमती कमला अनिल भास्कर (मोरगड), श्रीमती सुमन जांबू, श्रीमती पार्वती मोहरे, ललीता गाठे, सोनल बेलकर यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रमात करण्यात आले.
शहिदाच्या कुटुंबाला मंत्र्यांकडून अडीच लाखांची मदत
शहीद मुन्ना सेलुकर यांच्या कुटुंबाला पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य संवर्धन मंत्री महादेव जाणकर यांनी एक महिन्याचे वेतन अडीच लाख रुपये मदत म्हणून देण्याचे सदर कार्यक्रमात घोषित केले. तसेच आ. रवि राणा यांनी सहा महिन्यांचे वेतन मदत म्हणून धनादेश स्वरुपात पुनाजी सेलुकर यांना सुपूर्द केला.

Web Title: Shaheed Munna's parents' blood vessel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.