‘प्यार किया तो डरना क्या!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:36 PM2017-12-15T23:36:42+5:302017-12-15T23:42:05+5:30

तीन वर्षांपासून २२ वर्षीय तरुणीचा पाठलाग केला जात होता. तिला रस्त्यात अडवून कुटुंबीयांना मारहाण करण्याची धमकी दिली जायची.

'Pyaar kiya kya darena kya!' | ‘प्यार किया तो डरना क्या!’

‘प्यार किया तो डरना क्या!’

Next
ठळक मुद्देपोलिसांची तत्परताचार मजनूंच्या आवळल्या मुसक्या

घटना क्रमांक १
शरीरभर गोंदविले प्रेयसीचे नाव

आॅनलाईन लोकमत
अमरावती : तीन वर्षांपासून २२ वर्षीय तरुणीचा पाठलाग केला जात होता. तिला रस्त्यात अडवून कुटुंबीयांना मारहाण करण्याची धमकी दिली जायची. हे करणाºया तरुणाला राजापेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली. जितू ऊर्फ आकाश करोसिया (२६, रा. वर्धा, ह.मु. बेलपुरा) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात एकतर्फी प्रेमातून प्रियकराने कथित प्रेयसीचे नाव शरीरभर गोंदवून ठेवले आहे.
आकाश हा बेलपुऱ्यातील मामाकडे राहून शिक्षण घेत होता. दरम्यान, त्याची ओळख शहरातील एका २२ वर्षीय मुलीशी झाली. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याच्या उद्देशाने तो या तरुणीचा दररोज पाठलाग करायचा. तिला रस्त्यात अडवून माझ्यासोबत बोलत का नाही, तू बोलली नाहीस तर तुझ्या घरच्यांना मारहाण करेन, नाही तर स्वताच्या जिवाचे कमी-जास्त करेन, अशी धमकी द्यायचा. त्याच्या या विकृतीला तरुणी घाबरली होती.
आकाश हा खरेच आपले बरे-वाईट करेल, या भीतीपोटी सदर तरुणी आकाशशी बोलू लागली. मात्र, त्यानंतरही आकाशने तिचा पिच्छा पुरवला. तो तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न वारंवार करीत होता. रस्त्यात अडवून तिचा हात पिरगाळणे, गालावर थप्पड लगावण्याचे चाळेही वाढले होते. या त्रासाला कंटाळून अखेर त्या तरुणीने गुरुवारी राजापेठ पोलीस ठाणे गाठून आकाशविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून विनयभंगचा गुन्हा नोंदवून त्याला तत्काळ अटक केली. गुरुवारी रात्री इर्विन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याने छातीवर, हातावर अनेक ठिकाणी या तरुणीचे नाव गोंदविल्याचे निदर्शनास आले. हा मानसिक विकृतीचा प्रकार असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे.

अमरावती : प्रेमासाठी वाटेल ते... करण्याचे, तसे दाखविण्याचे अमरावती शहरातील तरुणाईला जणू काही वेडच लागले आहे. एका प्रकरणात तरुणाने संपूर्ण शरीरभर तरुणीचे नाव गोंदवून ठेवले आहे, तर गाडगेनगर हद्दीतील एका प्रेयसीने कथित प्रियकराचे घर गाठून दोन्ही कुटुंबीयांपुढे पेच निर्माण केला. या तथाकथित प्रेमवीरांच्या कचाट्यातून लहान मुलीही सुटलेल्या नाहीत. ही विकृती आवरता-आवरता पोलिसांच्याही नाकीनऊ येत आहे.
ज्या लैला-मजनू, हीर-रांझाच्या पावलावर पाऊल ठेवण्याची स्वप्ने रंगवायची, त्यांच्याकडून निखालस प्रेम म्हणजे काय, हे काहीच शिकायचे नाही. मात्र, पुढची मुलगी, मग ती कोणत्याही वयोगटाची असो, ती जाळ्यात कशी येईल, याचेच डावपेच शिकण्यात तरुणाई मश्गूल आहे. या विकृतीने दीपाली कुलकर्णी, प्रतीक्षा मेहत्रेसारख्या अनेकींचे बळी घेतले आहेत. मनीष मार्टिनचा कुंटणखाना व इतर ठिकाणे याच विकृतीची अपत्ये आहेत. शहरात विनयभंगाचे दररोज किमान दोन गुन्हे ठाण्यांमध्ये दाखल होत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांत शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये विनयभंगाचे सात गुन्हे नोंदविण्यात आले. त्यात गुरुवारी तब्बल पाच गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी महिलाविषयक गुन्ह्यात तत्परता दाखवून आरोपींना अटक केली. पोलीस व सामाजिक संस्थांद्वारा होणाऱ्यां जनजागृतीमुळे अलीकडच्या काळात महिला-मुली स्वयंसुरक्षेबाबत जागरूक होत आहेत, हे सौभाग्य म्हणावे.

घटना क्रमांक २
वर्गमित्रानेच केला जवळीक साधण्याचा प्रयत्न

रविनगरातील एका नामांकित महाविद्यालयात सन २०१६-१७ दरम्यान शिकणाऱ्यांविद्यार्थिनीला तिच्या वर्गमित्राने प्रेमजाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न सुरू केला. तिच्या मोबाइलवर प्रेमाचे संदेश पाठवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मुलीने नकार दिला. यामुळे बिथरलेल्या वर्गमित्राने तिला बदनाम करण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी अनूप आवारी (रा.वणी, ह.मु. रविनगर) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून आरोपीला तत्काळ अटक केली.

घटना क्रमांक ३

प्रेयसी ऐकेना, प्रियकराने केली मारहाण
प्रेमसंबंध जुळला. दीड महिन्यापूर्वी १९ वर्षीय मुलगी व २४ वर्षीय मुलगा नागपूरला गेले. त्यानंतर प्रेमाचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर ती मुलगी मानसिक तणावात आली. कारण ती प्रियकराच्या प्रेमात आंधळी झाली होती. तिला त्याच्याशिवाय करमत नव्हते. गुरुवारी ती एकवीरा विद्युत कॉलनीतील रहिवासी प्रियकर शुभम बाबूराव घोम (२४) याच्या घरी गेली. मात्र, शुभमच्या आईने तिला पाहताच दार बंद केले. तिने घरात शिरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. कुटुंबीय येताच तिने भिंतीवरून उडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. काटेरी झुडुपात अडकून ती जखमी झाली. यानंतर गाडगेनगर पोलिसांत धडकलेल्या या मुलीने शुभमने काटेरी फाद्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ३४१ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. शुभमचे वडील हे अमरावती ग्रामीण हद्दीत पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे पोलीस सांगत आहेत.

घटना क्रमांक ४
शाळकरी मुलीला प्रेमजाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न
गाडगेनगर हद्दीतील फ्रेन्ड्स कॉलनीत एका शाळकरी मुलीला प्रेमजाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला. एक अल्पवयीन मुलगी घरी जात असताना आरोपी अनिकेत ठाकूर (रा. नवसारी) याने तिचा दुचाकीने पाठलाग केला. मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू बोलली नाही तर तुला शाळेत जाऊ देणार नाही, असे बोलून त्याने तिला मारण्याची धमकी दिली. हा प्रकार त्या मुलीने वडिलांना सांगितला. तिच्या वडिलांनी तत्काळ गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून अनिकेत ठाकूरविरुद्ध तक्रार नोंदविली. या प्रकरणात पोलिसांनी अनिकेत ठाकूरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्याला तत्काळ अटक केली.

 

 

Web Title: 'Pyaar kiya kya darena kya!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.