सुविधा पोर्टलवर फेरीनिहाय माहिती उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:33 PM2019-05-20T22:33:36+5:302019-05-20T22:34:03+5:30

लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी नेमाणी गोडाऊन येथे २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. याकरिता यंत्रणा सज्ज आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर, मिळालेल्या मतांची माहिती १० मिनिटांच्या आता सुविधा पोर्टलवर अपलोड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Providing round-the-clock information on the convenience portal | सुविधा पोर्टलवर फेरीनिहाय माहिती उपलब्ध करणार

सुविधा पोर्टलवर फेरीनिहाय माहिती उपलब्ध करणार

Next
ठळक मुद्देशैलेश नवाल : मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी नेमाणी गोडाऊन येथे २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल. याकरिता यंत्रणा सज्ज आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर, मिळालेल्या मतांची माहिती १० मिनिटांच्या आता सुविधा पोर्टलवर अपलोड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मतगणनेसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात २० टेबल ठेवण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक मायक्रो आॅब्झर्व्हर असे तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या एकूण १८ फेऱ्या होणार आहेत. इव्हीएमच्या मतमोजणीसोबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात ईटीपीबीएस मतांची मोजणी चार टेबलवर करण्यात येणार आहे. टपाली मतपत्रिका आठ हजारांवर प्राप्त झाल्या व मतमोजणीपूर्वीच्या दिवशी उशिरापर्यंत स्वीकारल्या जाणार आहे. ईव्हीएममधील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सोडतीद्वारे पाच मतदान केंद्र निवडण्यात येतील व या केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतांशी त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होणार असल्याचे जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.
मतमोजणीकरिता एकूण १५० पर्यवेक्षक, १६० सहायक व १५० मायक्रो आॅब्झर्व्हर नियुक्त करण्यात आलेले आहेत. मतमोजणीच्या अनुषंगाने सुरक्षा कक्ष, मनुष्यबळ व्यवस्थापन, मतमोजणी प्रशिक्षण, टपाली व ईटीपीबीएस मतपत्रिका आदी जबाबदाºया पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील उपस्थित होते.
उमेदवारांनाही दिली प्रक्रियेची माहिती
अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेची माहिती सर्व उमेदवारांना सोमवारी देण्यात आली. यामध्ये मतमोजणी प्रतिनिधीसंदर्भात आयोगाचे निर्देश, प्रतिनिधींची भूमिका याविषयी माहिती देण्यात आली. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता स्ट्राँगरूम उघडली जाईल. उमेदवार किंवा प्रतिनिधीद्वारे नोंदविलेल्या हरकतीची तिथेच सुनावणी होईल. यासाठी मतमोजणी प्रक्रिया थांबविली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

Web Title: Providing round-the-clock information on the convenience portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.