सात चित्रपटगृहांत आजपासून ‘पद्मावत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:54 PM2018-01-24T22:54:06+5:302018-01-24T22:56:07+5:30

शहरातील सात चित्रपट गृहांतील नऊ पडद्यांवर 'पद्मावत' चित्रपट गुरुवारपासून प्रदर्शित होणार आहे.

'Padmavat' from seven theaters today | सात चित्रपटगृहांत आजपासून ‘पद्मावत’

सात चित्रपटगृहांत आजपासून ‘पद्मावत’

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलनकर्त्यांवर कारवाईचे आदेश : पोलीस आयुक्तांनी केली पाहणीकडेकोट बंदोबस्त

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहरातील सात चित्रपट गृहांतील नऊ पडद्यांवर 'पद्मावत' चित्रपट गुरुवारपासून प्रदर्शित होणार आहे. काही संघटनांचा या चित्रपटाला होणारा विरोध पाहता अमरावतीमधील सात चित्रपटगृहांना पोलिसांनी सरंक्षण दिले आहे. बुधवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांंनी गोपालनगरस्थित ई-आॅरबिट चित्रपट गृहाला भेट देऊन तेथील बंदोबस्ताचा आढावा घेत सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी योग्य सूचना दिल्या.
सर्वोच्च न्यायालयात व सेंसार बोर्डाने पद्मावत चित्रपटाला हिरवी झेंडी दिल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेसाठी बंदोबस्त ठेवण्याचे पोलिसांना सुचविले. तरीही देशातील काही ठिकाणी पद्मावत चित्रपटाला विरोध झालाच. अमरावती शहरातही विरोधाची स्थिती असल्याने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी चित्रपटगृहावर चोख बंदोबस्त लावला आहे.
बुधवारी शहरातील ई-आॅरबिट व चित्रा या दोन्ही चित्रपटगृहात सायंकाळी 'पद्मावत'चा प्रीमियर शो होता. त्या ठिकाणी काही अप्रिय घटना घडू नये, या दृष्टीने दोन्ही चित्रपट गृहांना पोलीस संरक्षण दिले. स्वत: पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी चित्रपट गृहाला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, एसीपी चेतना तिडके, पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, नीलिमा आरज, वाहतूक शाखेचे अर्जुन ठोसरे, अजय मालवीय उपस्थित होते. चित्रपटगृहात येणारे दर्शक कुठून येईल व कसे बाहेर जातील, त्यांची पार्किंग व्यवस्था कशी आहे, याबाबत सीपींनी आढावा घेतला.
बॅरिकेटस् लागले
पद्मावत चित्रपटास प्रेक्षकांची गर्दी उसळण्याची शक्यता पाहता पोलीस आयुक्तांनी पोलीस बंदोबस्ताचे योग्य ते नियोजन केले आहे. चित्रपटगृहात येणाºया नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने बॅरिकेटस् लावून एक मार्गी व्यवस्था करण्यात आली आहे.
आंदोलनकर्त्यांवर करडी नजर
पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी आंदोलनकर्ते कोठूनही दडगफेक करू शकतात. त्यादृष्टीने चित्रपटगृहाच्या आजूबाजूच्या पाचशे फुटांपर्यंत पोलीस गस्त लावणार आहे. संशयित व्यक्ती आणि आंदोलकांवर करडी नजर ठेवून त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहे.
३०० पोलीस तैनात राहणार
शहरातील चित्रा, सरोज, राजलक्ष्मी, ई-आरबिट, प्रभात व राजेश १ या चित्रपट गृहातील ९ स्क्रिनवर गुरुवारपासून पद्मावत चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटगृहांना ३०० पोलीस सरंक्षण देणार आहेत. प्रत्येक चित्रपटगृहाच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी असा बंदोबस्त लावला आहे.
वाहतूकही वळविणार
पद्मावत चित्रपट प्रदर्शनास विरोध पाहता नागरिकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने २५ जानेवारी रोजी संबंधित चित्रपटगृहासमोरील मार्गावरील वाहतुकीत गरजेनुसार बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पीआयअर्जुन ठोसरे यांनी केले.

Web Title: 'Padmavat' from seven theaters today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.