तालुका समन्वय समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 01:12 AM2017-12-31T01:12:02+5:302017-12-31T01:12:53+5:30

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जागेचे पट्टे, गायरान जमिनीवर होणारे अतिक्रमण, घरकूल व शौचालयासंदर्भातील अडचणी, अप्पर वर्धा कालव्यांची दुरुस्ती तसेच पुनर्वसितांच्या समस्या त्वरित निकाली काढण्याचे निर्देश आ़ वीरेंद्र जगताप यांनी सभेत दिले.

 Meeting of the Taluka Coordination Committee | तालुका समन्वय समितीची सभा

तालुका समन्वय समितीची सभा

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक समस्यांवर ऊहापोह : अतिक्रमणाच्या मुद्याकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव(रेल्वे) : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जागेचे पट्टे, गायरान जमिनीवर होणारे अतिक्रमण, घरकूल व शौचालयासंदर्भातील अडचणी, अप्पर वर्धा कालव्यांची दुरुस्ती तसेच पुनर्वसितांच्या समस्या त्वरित निकाली काढण्याचे निर्देश आ़ वीरेंद्र जगताप यांनी सभेत दिले.
स्थानिक पंचायत समिती कार्यालयात आ़ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समितीची सभा घेण्यात आली़ यावेळी प्रमुख अतिथी जि़प़ सदस्य प्रियंका दगडकर, सुरेश निमकर, वैशाली बोरकर, अनिता मेश्राम, पं़स़ सभापती सचिन पाटील, उपसभापती वनिता राऊत, सदस्य संगीता निमकर, ढोबळे, गणेश राजनकर, अतुल देशमुख, सविता इंगळे उपस्थित होते़
जुना धामणगाव येथील ई-क्लास जमिनीवर ३० वर्षांपासून राहत असलेल्या ग्रामस्थांना महसूल प्रशासनाने जागेचे पट्टे दिले नाहीत. याबाबत सर्वेक्षण करून पट्टे देण्याचे निर्र्देश आ़ जगताप यांनी महसूल प्रशासनाला दिले़ सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे ते काढून गुरे चारण्याकरिता परिसर मोकळा करावा, महावितरणने येथील समस्या निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले़

बोंडअळीचे सर्वेक्षण त्वरित करा...: तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले़ त्याचे सर्वेक्षण करून तत्काळ शेतकºयांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मदत देण्याचे आदेश कृषी विभागाने दिली आहे़

Web Title:  Meeting of the Taluka Coordination Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.