मुलीला स्वत:च्या पायावर उभे करण्याची जिद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:13 PM2018-05-12T22:13:37+5:302018-05-12T22:13:58+5:30

तो अंध. तीही त्याचीच सावली. ते अमरावतीत येतात. सोबत मुलगीही असते. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांकडे ते मदत मागतात. लोक मात्र अंध म्हणून त्यांची हेटाळणी करतात.

Let the girl stand on her feet | मुलीला स्वत:च्या पायावर उभे करण्याची जिद्द

मुलीला स्वत:च्या पायावर उभे करण्याची जिद्द

Next

अमरावती : तो अंध. तीही त्याचीच सावली. ते अमरावतीत येतात. सोबत मुलगीही असते. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांकडे ते मदत मागतात. लोक मात्र अंध म्हणून त्यांची हेटाळणी करतात. पदवीधर असलेला अंध नवरा लोकांना जेव्हा आपल्यावर गुदरलेला प्रसंग कथन करतो आणि माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत द्या, भीक नको, असे रोखठोक सांगतो तेव्हा आपसूकच त्यांच्या चेहºयावरचा कणखरपणा स्पष्टपणे जाणवतो.
मुलीच्या शिक्षणाची काळजी वाहणारे हे अंध दाम्पत्य आहे वर्षा व बंडू इरतकार. गाव खरबी, ता. चांदूर रेल्वे. मुंबईत तो उदरनिर्वाहाकरिता गेला आणि चांगला कमावत असतानाच डोळे गमावून गावी परतला. सामाजिक बांधीलकीतून त्याने अंध वर्षाशी विवाह केला. या दाम्पत्याला चार वर्षांची गोंडस मुलगी आहे. चिमुकल्या अक्षराला उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. मुलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळण्याची त्यांची इच्छा. वर्षाच्या आग्रहावरून घुईखेडवरून हे दाम्पत्य आठवड्यातून तीन दिवस एसटीने अंबानगरीत येतात. मदतीचे हात यावेत, हीच त्यांची अपेक्षा
समाजभावनेला साद
बंडू इरतकार पदवीधर आहे. त्याची पत्नीही समजूतदार आहे. चांगले शिक्षण घ्यायचे असल्यास किती आटापिटा करावा लागतो, याचे या दाम्पत्याला भान आहे. त्यामुळेच ते समाजभावनेला साद घालून मदतीची (भीक नव्हे) याचना करतात. त्यांना खºया अर्थाने मदतीचे हात मिळणे गरजेचे आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, समाजसेवी संस्थांनी याबाबत सुहृद विचार करण्याची गरज आहे.

Web Title: Let the girl stand on her feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.