कुऱ्हाडीचे वार, विटांनी ठेचून तरुणाची हत्या; तीन भावंडांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:29 AM2019-07-10T01:29:18+5:302019-07-10T01:29:38+5:30

मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तीन भावंडांनी एका तरुणाची कुºहाडीचे वार करून व विटांनी ठेचून हत्या केली. सौरभ राजेंद्र गोसावी (३५, रा. शेगाव) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गाडगेनगर हद्दीतील रंगोली मंगल कार्यालयामागे सोमवारी रात्री घटना घडली.

Kurhadi wars, crushed brick; Crime against three siblings | कुऱ्हाडीचे वार, विटांनी ठेचून तरुणाची हत्या; तीन भावंडांविरुद्ध गुन्हा

कुऱ्हाडीचे वार, विटांनी ठेचून तरुणाची हत्या; तीन भावंडांविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्देरंगोली मंगल कार्यालयामागील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तीन भावंडांनी एका तरुणाची कुºहाडीचे वार करून व विटांनी ठेचून हत्या केली. सौरभ राजेंद्र गोसावी (३५, रा. शेगाव) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गाडगेनगर हद्दीतील रंगोली मंगल कार्यालयामागे सोमवारी रात्री घटना घडली.
पोलीस सूत्रानुसार, गजानन मोहोड, विजय मोहोड व राजा मोहोड (तिन्ही रा. शेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. सौरभ गोसावी हा वाहनचालक होता. सोमवारी सौरभ सर्व कामे आटोपून शेगाव परिसरातील एका दारूच्या दुकानावर गेला होता. तेथे आरोपींनी त्याला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. सौरभ नकार देऊन तेथून निघून गेला.
दरम्यान आरोपींनी सौरभला रंगोली मंगल कार्यालयामागील परिसरात गाठले आणि त्याला मारहाण सुरू केली. मद्यधुंद आरोपी सौरभला बेदम मारहाण करीत होते. जबर मारहाणीत सौरभ जमिनीवर कोसळला. तरीसुद्धा आरोपींनी त्याला मारहाण सुरूच ठेवली.
आरोपींनी कुºहाडीचे वार करून व विटांनी हल्ला करून सौरभला गंभीर जखमी केले. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सौरभला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे सौरभचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक सौरभचे वडील राजू भाऊराव गोसावी (५६, रा. शेगाव) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हत्येचा व्हिडीओ व्हायरल
सोमवारी सांयकाळी रंगोली मंगल कार्यालयामागील रोडवर सौरभची हत्या करण्यात आली. वर्दळीच्या रस्त्यावर सौरभवर हल्लेखोर हल्ला करीत असल्याचे अनेकांनी पाहिले. तीन व्यक्ती सौरभला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ काही नागरिकांनी दुरूनच काढला. तो व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपच्या विविध ग्रुपवर व्हायरल झाला आहे.

Web Title: Kurhadi wars, crushed brick; Crime against three siblings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून