सहा वर्षांत ६१० शेतकऱ्यांना कीटकनाशकाची विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:18 AM2018-09-21T01:18:54+5:302018-09-21T01:19:55+5:30

कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली.

Insecticide poisoning to 610 farmers in six years | सहा वर्षांत ६१० शेतकऱ्यांना कीटकनाशकाची विषबाधा

सहा वर्षांत ६१० शेतकऱ्यांना कीटकनाशकाची विषबाधा

Next
ठळक मुद्देशासनाचा अहवाल : यंदा पाच महिन्यांत ९५ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना सहा वर्षांत ६१० शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त आहे. यामध्ये सर्वाधिक २०९ शेतकऱ्यांना मागील वर्षी विषबाधा झाली. यामध्ये तीन जनांचा मृत्यू झाल्याचे वास्तव आहे. कीटकनाशक कंपन्यांद्वारा शेतकºयांना सुविधेची साधने पुरवीत नसल्यानेच फवारणी शेतकºयांच्या जीवावर उठली असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत ५०५ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकाची विषबाधा झाली. यामध्ये २०१२ मध्ये ७२, सन २०१३ मध्ये ५५, सन २०१४ मध्ये ६२, सन २०१५ मध्ये ५७, सन २०१६ मध्ये ५० तर सन २०१६ मध्ये सर्वाधिक २०९ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकांची विषबाधा झाली. मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात २० तर विदर्भात ३५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर कीटकनाशकांचा फवारणी ही मृत्यूचीच फवारणी असल्याची बाब प्रथम उघडकीस आली. त्यानंतर शासनाने याविषयी गांभीर्याने घेणे सुरू केले आहे. कृषी विभागाद्वारा याविषयी जनजागृती करण्यात येत असली तरी यावर प्रभावी अंलबजावणी नसल्यामुळेच सध्याही शेतकरी विषबाधित होत असल्याचे वास्तव आहे.
पेरणीनंतरच्या चार महिन्यांमध्येच मोठ्या प्रमाणवर विषबाधितांचे प्रकरण समोर येत आहेत. मागील वर्षी जानेवारी महिन्यात ६, फेब्रुवारी ३, मार्च ५, एप्रिल ३, मे ६, जून १०, जुलै १७, आॅगस्ट ३५, सप्टेेंबर ६२ आॅक्टोबर ३२, नोव्हेंबर २६ व डिसेंबर महिन्यात ४ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
२.१० लाखांच्या साठ्यास विक्रीबंदचे आदेश
गुण नियंत्रण पथकाने जिल्ह्यातील कीटकनाशकांचे १२२ सॅम्पल घेतले. यामध्ये ५ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. ९१५ परवान्यांची तपासणी केली असता ५५७ मे.टन साठ्यास विक्रीबंदचे आदेश देण्यात आले. याची किमंत २.१० लाख आहे. विभागीय गुण नियंत्रण पथकाने अखेर ही कारवार्ई केल्याचे कृषी विभागाने सांगितले.

Web Title: Insecticide poisoning to 610 farmers in six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.