धावती ट्रेन उलटून सात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:25 PM2017-11-26T23:25:16+5:302017-11-26T23:25:27+5:30

पर्यटन स्थळ असलेल्या वडाळीस्थित बांबू गार्डनमधील धावती ट्रेन उलटून सात महिला जखमी झाल्यात. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच फे्रजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Injured seven women injured in train | धावती ट्रेन उलटून सात महिला जखमी

धावती ट्रेन उलटून सात महिला जखमी

Next
ठळक मुद्देवडाळीतील बांबू गार्डनमधील घटना : फे्रजरपुरा पोलीस पोहोचले घटनास्थळी

अमरावती : पर्यटन स्थळ असलेल्या वडाळीस्थित बांबू गार्डनमधील धावती ट्रेन उलटून सात महिला जखमी झाल्यात. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच फे्रजरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जखमी रुग्णालयात पोहोचले होते.
नवनिर्मित बांबू गार्डनमध्ये जगविख्यात विविध प्रजातीच्या बांबू वृक्षांची लागवड करण्यात आली असून ते पर्यटनस्थळ म्हणून आकर्षण ठरत आहे. रविवारी सुटीच्या दिवशी अनेक पर्यटक तेथे आनंद घेण्यासाठी जातात. त्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी शिवशक्ती कॉलनीतील योगा क्लॉसेसमधील २५ ते ३० महिला व त्यांचे लहान मुले-मुली बांबू गार्डनमध्ये फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान सगळीकडे निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर काही महिला 'जॉय ट्रेन'मध्ये बसल्या. मात्र, धावत्या ट्रेनचा मागील डब्बा उलटल्यामुळे सर्व डब्बेच खाली कोसळले. या अपघातात दोन महिलांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अन्य महिला जखमी झाल्यात. ही माहिती सागर नामक चालकाने वरिष्ठ अधिकाºयांना दिली. वनकर्मचाºयांनी महिलांना तत्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले.
अशी आहेत जखमींची नावे
ट्रेन उलटून जखमी झालेल्या महिलांमध्ये ममता अरुण डवले (४२रा.शिवशक्तीनगर), सुनीता शालीकराम मोहोकार (४५,रा. महाविरनगर), मालती मनोहर नाईक (४८), अरुण कवले (४२), रजनी नारायण बाहेकर (६०), रजनी अशोक बलिंगे (४७), साधना नरेंद्र रावेकर यांचा समावेश आहे.

ट्रेनचा मागील डब्बा उलटल्यामुळे अन्य डब्बेसुध्दा रुळावरून घसरले. या अपघातात सात महिला जखमी असून त्यापैकी एक महिला गंभीर आहे. अपघाताविषयी चौकशी सुरू आहे.
- एच.व्ही.पडगव्हाणकर,
वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी
चालकाविरुद्ध नोंदविणार गुन्हा!
बाबू गार्डनमधील ट्रेन चालविणारा सागर नामक इसम भरधाव ट्रेन चालवित असल्याचे जखमींचे म्हणणे आहे. त्याच्या कानात ईअरफोन असल्याचे महिलांनी सांगितले. घटनेचा पंचनामा फ्रेजरपुरा पोलिसांनी केला. जखमीच्या बयाणावरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

Web Title: Injured seven women injured in train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.