मुस्लिमबहुल भागातील विदर्भातला पहिला घरकुल प्रकल्प अमरावतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 09:37 PM2019-02-24T21:37:57+5:302019-02-24T21:38:17+5:30

आकोली वळण ररस्त्याने बेघर झालेल्या मुस्लिम कुटुंबांना आता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. किंबहुना मुस्लिमबहुल वस्तीमधील विदर्भातील पहिला प्रकल्प अमरावती शहरात साकारला जात आहे.

The first house-building project in Vidarbha in the Muslim-dominated areas of Amravati | मुस्लिमबहुल भागातील विदर्भातला पहिला घरकुल प्रकल्प अमरावतीत

मुस्लिमबहुल भागातील विदर्भातला पहिला घरकुल प्रकल्प अमरावतीत

Next

- गजानन मोहोड

अमरावती : आकोली वळण ररस्त्याने बेघर झालेल्या मुस्लिम कुटुंबांना आता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. किंबहुना मुस्लिमबहुल वस्तीमधील विदर्भातील पहिला प्रकल्प अमरावती शहरात साकारला जात आहे. यामध्ये आर्थिकदृट्या दुर्बल गटातील लाभार्थींना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान या घटकांतर्गत हा लाभ देण्यात आलेला आहे.
शहराच्या पश्चिमेकडील लालखडी हा प्रामुख्याने मुस्लिमबहुल परिसर आहे. अकोली वळणरस्त्याच्या कामात या भागातील १२० कुटुंबे बाधित होणार होती. तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांनी प्रत्येकी ५०० चौरस मीटर जागा देऊन या कुटुंबांचे पुनर्वसन दोन एकर जागेमध्ये केले. त्याला इमामनगर असे नाव देण्यात आले. या वस्तीमध्ये राहणारे नागरिक प्रामुख्याने श्रमजिवी वर्गातील मोलमजुरी करणारे आहेत. त्यामुळे पक्की घरे बांधणे त्यांना शक्य नव्हते. आतापर्यतच्या घरकुल योजनेतील अनेक जाचक अटींमुळे हे नागरिक घरकुलांपासून वंचित होते. मात्र, ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने आता या ठिकाणी आता नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल बांधण्याचा मार्ग प्रशस्त झालेला आहे. विदर्भातील मुस्लिीमबहुल भागातील हा पहिलाच घरकुल प्रकल्प ठरला आहे.
प्रकल्पामध्ये ६० नागरिकांनी अर्ज केलेत. यापैकी २७ नागरिकांनी आपल्या जागेचे रीतसर शुल्क भरून परवानगी घेतल्याने या नागरिकांना आता घरकुलाचा लाभ मिळत आहे. या नागरिकांना त्यांच्या बांधकामानुसार घरकुलाचा हप्ता देण्यात आलेला आहे. काही नागरिक परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. या नागरिकांना घरकुल स्वत: बांधायचे आहे. यामध्ये जोथ्यापर्यंत बांधकाम झाल्यावर  एक लाख, छतापर्यंत आल्यानंतर एक लाख व घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ५० हजार मिळतील, असे उपअभियंता सुनील देशमुख म्हणाले.  

महापालिकेत योजनेची सद्यस्थिती
 योजनेच्या ४७३२ लाभार्थींना केंद्राच्या मान्यता व सनियंत्रण समितीने डीपीआरला मान्यता दिली. आतापर्यंत यासाठी ५५.८६ कोटी या घटकांतर्गत प्राप्त झाले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वार्षिक तीन लाखांपर्यंत उत्पन्न असणाºया लाभार्थ्यांना ३० चौ.मी. घरकुलाचे बांधकाम करावयाचे आहे.  

आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांसाठी घरकुल उभारले जात आहे. विदर्भातील मुस्लिमबहुल भागातील हा पहिलाच प्रकल्प अमरावतीत निर्माणाधीन आहे.
- सुनील देशमुख, उपअभियंता, पंतप्रधान आवास योजना

Web Title: The first house-building project in Vidarbha in the Muslim-dominated areas of Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.