पहिल्या दिवशी पाच हजार स्वाक्षऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:01 PM2018-04-20T22:01:53+5:302018-04-20T22:01:53+5:30

अंबानगरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, याकरिता एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ जिल्हा सामान्य रूग्णालय व बाजार समितीतून शुक्रवारी करण्यात आला.

On the first day, five thousand signatures | पहिल्या दिवशी पाच हजार स्वाक्षऱ्या

पहिल्या दिवशी पाच हजार स्वाक्षऱ्या

Next
ठळक मुद्देशासकीय मेडिकल कॉलेज : इर्र्विन, बाजार समितीतून मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबानगरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, याकरिता एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ जिल्हा सामान्य रूग्णालय व बाजार समितीतून शुक्रवारी करण्यात आला. या स्वाक्षरी अभियानाला चांगला प्रतिसाद लाभला असून, पहिल्याच दिवशी पाच हजार नागरिकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर यांनी दिली.
स्थायी समिती सभापती विवेक कलोती, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, डॉ. बबन बेलसरे, पीडीएमसीचे डीन डॉ. पद्माकर सोमवंशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींचा मोहिमेत सहभाग होता. नागपूरच्या तुलनेत जिल्ह्यात वैद्यकीय प्रवेशाच्या २४० जागांचा बॅकलॉग आहे. तो भरून काढण्यासाठी महाविद्यालयाचे महत्त्व शासनाला स्वाक्षरी अभियानातून पटवून दिले जाणार आहे. बाजार समिती संचालक किरण महल्ले व सतीश अटल या अभियानाचा शुभारंभ केला. राजेश पाटील, दीपक जाजू, बंडू वानखेडे, राजू दायमा, राजू लिखितकर, जितु कुरवाने, झकीर जमाल, अंकित जैन, प्रकाश सरदार, नितीन अतकरे, सचिन नाईक, नंदू मिश्रा, नवल सारडा, सुनील मालपाणी, डॉ. नागलकर, धीरज बारबुद्धे यांनी सहकार्य केले. यावेळी शेतकरी, कामगार, अडते, व्यापारी, उद्योजक मोठ्या प्रमाणात हजर होते.

Web Title: On the first day, five thousand signatures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.