आगीत दहा झोपड्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:42 PM2019-03-22T22:42:05+5:302019-03-22T22:42:28+5:30

वलगाव मार्गालगतच्या रॉयल पॅलेसजवळील परिसरात वसलेल्या तब्बल दहा झोपड्या शुक्रवारी दुपारी आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर दोन तासांनी आग आटोक्यात आली. या आगीमुळे कामगारांची दहा कुटुंबीये उघड्यावर आली आहेत.

In the fire, ten slopes | आगीत दहा झोपड्या खाक

आगीत दहा झोपड्या खाक

Next
ठळक मुद्देवलगाव मार्गावरील घटना : अग्निशमनच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वलगाव मार्गालगतच्या रॉयल पॅलेसजवळील परिसरात वसलेल्या तब्बल दहा झोपड्या शुक्रवारी दुपारी आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर दोन तासांनी आग आटोक्यात आली. या आगीमुळे कामगारांची दहा कुटुंबीये उघड्यावर आली आहेत.
वलगाव मार्गालगतच्या या परिसरात काही कामगारांनी लहान झोपड्या बांधून वास्तव सुरू केले आहे. या परिसरात ४० च्यावर झोपड्या बांधून कामगार जीवन कंठत आहेत. त्यामध्ये विविध ठिकाणच्या कामावरील मजूर वास्तव्यास आहेत. शुक्रवारी दुपारी अचानक रामपाल बेलकार नामक मजुराच्या झोपडीला आग लागली. या झोपड्या खुल्या परिसरात असल्यामुळे एका झोपडीपासून दुसऱ्या झोपडीपर्यंत आग सहजरीत्या पसरली. या घटनेच्या माहितीवरून अग्निशमन दलाने घटनास्थळी पाचारण केले. दरम्यान काही वेळातच आगीने तब्बल दहा झोपड्यांना विळख्यात घेतले. अग्निशमनचे उपक्रेंद्रप्रमुख सैय्यद अनवर यांच्या पथकातील उपासे, हाजी खान, खर्चान यांच्यासह मुख्य केंद्राचे फायरमन व अन्य कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रण आणण्याकरिता पाण्याचा वर्षाव करीत आग जिकरीचे प्रयत्न सुरू केले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन जवानांना यश आले. मात्र, या आगीत दहा झोपड्या जळून खाक झाल्यात. या गरीब कामगारांचे कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.
या घटनेच्या माहितीवरून गुन्हे शाखेसह वलगाव पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्न चालविले. प्रशासकीय मदत मिळण्याची अपेक्षा कामगारांची आहे, मात्र, अद्याप कोणतीही शासकीय यंत्रणा मदतीसाठी पोहोचली नव्हती. या आगीचे निश्चीत कारण कळू शकले नाही.


 

Web Title: In the fire, ten slopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.