मोबदल्यासाठी उपवनसंरक्षकांच्या दालनात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:15 AM2017-08-19T00:15:10+5:302017-08-19T00:15:46+5:30

चार कोटी वृक्ष लागवडीच्या कामावरील मजुरांना श्रमाचा मोबदला अद्यापही न दिल्याने शुक्रवारी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

In exchange for the cost of the supervisor's house | मोबदल्यासाठी उपवनसंरक्षकांच्या दालनात ठिय्या

मोबदल्यासाठी उपवनसंरक्षकांच्या दालनात ठिय्या

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलन : आमदार विरेंद्र जगताप आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चार कोटी वृक्ष लागवडीच्या कामावरील मजुरांना श्रमाचा मोबदला अद्यापही न दिल्याने शुक्रवारी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतुतवात अन्याग्रस्त मजूर मोबदल्यासाठी चांगलेच आक्रमक झाले होते.
चार कोटी वृक्ष लागवडीच्या कामावर चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला व अन्य गावातील शेकडो मजूरांनी काम केले. मात्र या मजूरांना अद्यापपर्यतही त्याच्या कामाचा मोबदला वनविभागाकडून मिळाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत आ. जगताप यांनी उपवनसंरक्षक मिणा यांना तातडीने मजूरांचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी रेटून धरली. वनविभागाचे आदेशानुसार चार कोटी वृक्ष लागवडीचे कामे केल्यावरही दोन महिन्यापासून मोबदला मिळत नसल्याने आ. वीरेंद्र जगताप यांनी खेद व्यक्त केला. यापूर्वीही मजूराचे र्पैसे देण्यात यावे यासाठी वनविभागाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार १६ आॅगस्ट रोजी देण्याचे उपवनसंरक्षक मिना यांनी दिले. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने मोबदला दिल्याशिवाय ठिय्या दिलेले मजूर हटणार नाहीत अशी भूमिका जगताप यांनी घेतली. अखेर येत्या दोन दिवसात मजुरांचा मोबदला देण्याचे आश्वासन वनविभागाच्या अधिकाºयांनी दिले. त्यामुळे आंदोलन निवळले. या आंदोलनात दिपक गिरासे,श्रीधर बरडे,बाळू शेंदरे,अवधूत शेंदरे,सुनील मडावी,बंडू मेश्राम,गणपत मेश्राम,सुभाष राठोड,किष्णा शेंदरे,विकी शेंदरे आदीचा समावेश होता.

Web Title: In exchange for the cost of the supervisor's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.