मतदान प्रक्रियेत नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:46 AM2019-04-27T00:46:18+5:302019-04-27T00:47:59+5:30

सतराव्या लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांच्या मतदानाचा टक्का आघाडीवर होता. अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर आणि तिवसा विधानसभा मतदारसंघांत ५,३७० दिव्यांग मतदार आहेत.

 Divya Singh's lead among regular voters in the process of voting | मतदान प्रक्रियेत नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांची आघाडी

मतदान प्रक्रियेत नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांची आघाडी

Next
ठळक मुद्देनिवडणूक : ५३७० हजारांपैकी ३७९१ जणांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सतराव्या लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात नियमित मतदारांपेक्षा दिव्यांगांच्या मतदानाचा टक्का आघाडीवर होता. अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर आणि तिवसा विधानसभा मतदारसंघांत ५,३७० दिव्यांग मतदार आहेत. यापैकी ३,७९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ७०.६० एवढी आहे.
मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा अपेक्षेपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ग्रामीण व शहरी भागातील दिव्यांगांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने यावेळी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदारांमध्ये विविध उपक्रम राबविले. याची जबाबदारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदार जागृती अभियानाचे नोडल अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे सोपविली होती. यात स्वीप टीमच्या सर्व सहकाऱ्यांनी प्रभावी जनजागृती केली.
निवडणूक विभागाने यावेळी दिव्यांगासाठी प्रशासनाला चोख नियोजनाचे निर्देश दिले होते. यामध्ये दिव्यांग मतदारांची नोंदणी, दिव्यांग मतदार जागृतीवर भर दिला होता. घर ते मतदान केंद्र आणि मतदान केंद्र घरापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. मतदान केंद्रावर मदतीसाठी सहायकांची व्यवस्था तैनात होती. दिव्यांग मतदारांनीही प्रशासनाच्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळेच सहा विधानसभा मतदारसंघात नावनोंदणी असलेल्या ५ हजार ३७० दिव्यांग मतदारांपैकी ३ हजार ७९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. दिव्यांग मतदारांची मतदानाची टक्केवारी ही ७०.६० टक्के एवढी आहे. यामुळे नियमित मतदारांच्या ६० टक्क््यांपेक्षा जास्त होते. जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मतदानाचा गतवेळपेक्षा बºयापैकी वाढल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी सांगितले.

असे झाले मतदान
अमरावती लोकसभा मतदारसंघातील दर्यापूर ग्रामीणमध्ये १०७० पैकी ६७२, नगर परिषद क्षेत्रात २३२ पैकी २६२, अंजगाव ग्रामीण ६४२ पैकी ४७४, तर नगपरपालिका क्षेत्रात १८३ पैकी १०८, धारणी ग्रामीण १९९ पैकी १३७, नगरपंचायत १० पैकी ६, चिखलदरा ७७ पैकी ५७, नगर परिषद ३ पैकी १, अचलपूर ग्रामीण १३७ पैकी १०८, नगर परिषद ६७ पैकी ३२, चांदूर बाजार ग्रामीण ३०१ पैकी २०१, नग परिषद ४२ पैकी ३६, तिवसा ग्रामीण ४३० पैकी २९१, नगपंचायत ७४ पैकी ६२, मोर्शी तालुक्यात २६ गावांमध्ये २४३ पैकी २०१, अमरावती ग्रामीण ३६४ पैकी २६९, शहर ५६६ पैकी ४०१, भातकुली ग्रामीण२२५ पैकी १६७, नगरपंचायत ५० पैकी ५०, बडनेरा विधानसभा व मनपा क्षेत्रात ४४६ पैकी ३३५ अशा एकूण ५ हजार ३७० पैकी ३ हजार ७९१ दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. १ हजार ५७९ मतदारांनी मात्र मतदानाचा हक्क बजावला नाही.

Web Title:  Divya Singh's lead among regular voters in the process of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Votingमतदान