शिक्षकांच्या समस्यांबाबत शिक्षण संचालकांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 09:54 PM2018-05-18T21:54:13+5:302018-05-18T21:54:13+5:30

विभागातील शिक्षकांच्या समस्यांबाबत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शुक्रवारी राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांच्याशी संवाद साधला. अनेक मुद्द्यांवर सकारात्मक तोडगा यावेळी काढण्यात आला.

Discuss with teacher directors about teacher problems | शिक्षकांच्या समस्यांबाबत शिक्षण संचालकांशी चर्चा

शिक्षकांच्या समस्यांबाबत शिक्षण संचालकांशी चर्चा

Next
ठळक मुद्देशेखर भोयर : संगणक परीक्षा उत्तीर्ण अटीवर मुदतवाढीचा तोडगा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागातील शिक्षकांच्या समस्यांबाबत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शुक्रवारी राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांच्याशी संवाद साधला. अनेक मुद्द्यांवर सकारात्मक तोडगा यावेळी काढण्यात आला.
शालार्थ वेतन प्रणालीमध्ये केवळ आॅनलाइनमध्ये नाव समाविष्ट नसल्यामुळे वंचित शिक्षकांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने अदा करा, २० टक्के अनुदान असूनही थकीत वेतनाचा प्रश्न निकाली काढा, शिक्षक बांधवांना एमएससीआयटी उत्तीर्ण असण्याबाबतच्या अटीस मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून शिक्षक बांधवांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही या मुद्द्यांवर शिक्षण संचालकांंनी सहमती दर्शविली तसेच मुदतवाढ देण्याचे मान्य केले. मूल्यांकनापासून व अनुदानापासून मान्यतेअभावी कोणतीही शाळा वंचित राहू नये, यासाठी मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिबिर घेण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांना परवानगी देण्यात यावी, वरिष्ठ व निवडश्रेणीचा जाचक शासननिर्णयातील अटी शिथिल करण्यात याव्या, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यताप्रकरणी न्याय मिळवून देण्यात यावा आदी विविध प्रश्नांवर शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षक महासंघाचे अमरावती जिल्हा सचिव मोहन ढोके, नितीन टाले, उपाध्यक्ष पी.आर. ठाकरे, विभागीय प्रसिद्धी प्रमुख अजयसिंह बिसेन, आशिष बोरकर, आकाश भोयर, सुमीत वानखडे यांच्यासह विभागातील बहुसंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते.

Web Title: Discuss with teacher directors about teacher problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.