भाकपचा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:17 PM2018-04-10T23:17:36+5:302018-04-10T23:18:18+5:30

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने विभागातील शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या ज्वलंत प्रश्नासाठी मंगळवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

Dhadkala Morcha on CPI's departmental commissioner's office | भाकपचा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला मोर्चा

भाकपचा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देजनअधिकारीसाठी-जनआंदोलन : विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने विभागातील शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या ज्वलंत प्रश्नासाठी मंगळवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया समोर रोखला. दरम्यान, भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.
प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज व कृषिपंपाचे वीजबिल माफ करा, स्वामीनाथन आयोग लागू करा, शेतकरी, शेतमजूर, सर्व असंघटित कामगारांना ६० वर्षानंतर १० हजार रूपये मासिक पेंशन सुरू करा, कापूस उत्पादकांना हेक्टरी ४० हजार रुपये बोंडअळीची भरपाई द्यावी, अमरावती विभाग दुष्काळग्रस्त जाहीर करा. सर्व असंघटीत कामगार, अंगणवाडी, घरकामगार, शालेय पोषण आहार, आशा, ग्रा.पं. कर्मचारी, बांधकाम कामगार, रोजगार सेवक यांच्या न्याय मागण्याची सोडवणूक करावी, वनहक्क कायद्यानुसार आदिवासींना जमिनीचे वाटप करा, सर्व बेघरांचा पंतप्रधान आवास योजनेत समावेश करा आदींचा समावेश आहे. मोर्चात भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, जिल्हासचिव सुनील मेटकर, चंद्रकांत वडस्कर, सुनील घटाळे, जे. एम. कोठारी, अशोक सोनारकर, विनोद जोशी, बी.के. जाधव, एम. वाय. शहाणे, चंद्रकांत बानुबाकोडे, गणेश अवझाडे, रामचंद्रसिंग यादव, नीळकंठ ढोके, सागर दुर्योधन, क्रांती देशमुख, लक्ष्मण धाकडे, नितीन गादे, राहुल मंगळे आदी सहभागी झाले होते.

किसान निर्धार लाँगमार्च...: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मंगळवारी जनअधिकारासाठी-जनआंदोलनात सहभाग रहावा यासाठी कुऱ्हा ते अमरावती विभागीय आयुक्तकार्यालयापर्यंत किसान निर्धार लाँग मार्च काढण्यात आला. ९ एप्रिल रोजी निघालेला हा लाँगमार्च १० एप्रिल रोजी शहरात पोहचला. यावेळी पदयात्रेत मोठ्या संख्येने पुरूष, महिला व वृद्ध सहभागी झाले होते.

Web Title: Dhadkala Morcha on CPI's departmental commissioner's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.