मेळघाटातील तलावात वाघाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:23 AM2019-05-10T06:23:37+5:302019-05-10T06:23:49+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पाण्यात आढळला.

 Death of Tiger in Melghat | मेळघाटातील तलावात वाघाचा मृत्यू

मेळघाटातील तलावात वाघाचा मृत्यू

googlenewsNext

चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पाण्यात आढळला. गुरुवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील कोहा या पुनर्वसित गावातील अतिसंरक्षित परिसरातील एका छोटेखानी तलावात टी-३२ क्रमांकाचा सात वर्षे वयाचा नर वाघ पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, ते संशोधन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. दरम्यान, या वाघाच्या मृत्यूसंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही.
कोहा हा परिसर मनुष्यविरहित आहे. वाघ पाण्यात बुडून त्याचा मृत्यू होऊ शकत नाही, त्यामुळे विष-प्रयोगाने वाघाची शिकार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर वाघ पाणी पिण्यासाठी त्या परिसरात गेला व त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title:  Death of Tiger in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ