अमरावतीमधील एटीएम क्लोनिंग प्रकरणातील सायबर चोरटे उत्तरप्रदेशातले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 10:17 AM2017-11-30T10:17:57+5:302017-11-30T10:19:37+5:30

भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून खात्यातील रक्कम परस्पर पळविणारे आरोपी उत्तर प्रदेशातील निघाले.

Cyber thieves in Amravati's ATM cloning case are from Uttar Pradesh, | अमरावतीमधील एटीएम क्लोनिंग प्रकरणातील सायबर चोरटे उत्तरप्रदेशातले

अमरावतीमधील एटीएम क्लोनिंग प्रकरणातील सायबर चोरटे उत्तरप्रदेशातले

Next
ठळक मुद्देअमरावती पोलीस घेणार ताब्यात२५ खातेदारांच्या खात्यातून २४ लाख उडवले

आॅनलाईन लोकमत
अमरावती : भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून खात्यातील रक्कम परस्पर पळविणारे आरोपी उत्तर प्रदेशातील निघाले. चंद्रपूर पोलिसांनी त्यांच्यापैकी एक असलेला संतोष लालता फेरवार (३२)याला महिनाभरापूर्वीच अटक केली. सद्यस्थितीत विविध शहरांतील पोलीस त्याच्या कस्टडीची मागणी करीत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील एसबीआय खातेदारांच्या एटीएमसंबंधी माहिती चोरून क्लोनिंगद्वारे परस्पर पैसे काढण्यात येत असल्याचा प्रकार अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील २५ खातेदारांच्या खात्यातून तब्बल २४ लाखांची रक्कम सायबर गुन्हेगारांनी चोरली. चंद्रपुरातही अशाप्रकारचे दोन गुन्हे घडले. संतोष सद्य न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याला विविध पोलीस ठाण्यांकडून चौकशीकरिता ताब्यात घेण्याचे प्रयत्न होत आहेत.

उत्तर प्रदेशातील टोळी

सायबर गुन्ह्यातील आरोपी हे उत्तर प्रदेशातील असून चंद्रपूर आणि अमरावतीमधील एटीएममध्ये आढळलेल्या एकसारख्या चेहºयांवरून आरोपींची ओळख पटली आहे. सद्यस्थितीत पोलिसांच्या गळाला मोहराच लागला. तो एटीएमधारकांची माहिती चोरण्यासाठी ५०० रुपये रोज घ्यायचा व त्या माहितीच्या आधारे त्याचे पसार साथीदार कार्ड क्लोनिंग करून बँक खातेदारांचे पैसे चोरत असल्याचे चौकशीत पुढे आल्याची माहिती अमरावतीच्या सायबर सेलच्या अधिकाºयांनी दिली.

Web Title: Cyber thieves in Amravati's ATM cloning case are from Uttar Pradesh,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा