ठेकेदार जुझर सैफीकडून महापालिका आवार गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:18 PM2018-02-07T22:18:40+5:302018-02-07T22:19:09+5:30

महापालिकेचे नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार जुझर सैफी यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील व्यापक जागा बळकावली आहे.

Contractor Juzer Saifi of the Municipal Premises | ठेकेदार जुझर सैफीकडून महापालिका आवार गिळंकृत

ठेकेदार जुझर सैफीकडून महापालिका आवार गिळंकृत

googlenewsNext
ठळक मुद्देअतिक्रमण : प्रशासनाचा वरदहस्त

आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापालिकेचे नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार जुझर सैफी यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील व्यापक जागा बळकावली आहे. मागील वर्षभरापासून त्यांचे बांधकाम साहित्य महापालिकेच्या आवारात अनधिकृतपणे साठवले गेले असताना याबाबत विचारणा करण्याचे धाडस प्रशासनाने दाखविलेले नाही. त्यामुळे सैफीवर असलेला प्रशासनाचा वरदहस्त जगजाहिर झाला आहे.
जुझर सैफींनी महापालिकेच्या आवारात लोखंडी सळाखी व अन्य साहित्य साचून ठेवल्याने पार्किंग बाधित झाले आहे. अस्त्याव्यस्त सळाखी अपघाताला निमंत्रण देत आहेत. प्रशासकीय इमारतीच्या आवारात खासगी बांधकाम साहित्य ठेवण्यास त्या ठेकेदाराला परवानगी दिली तरी कुणी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. महापालिकेचे आवारच एखाद्या ठेकेदाराला वापरण्यास देण्याची मुभा वजा नियम तरतूद महाराष्टÑ महानगरपालिका अधिनियमांमध्ये आहे का, याचे उत्तर बांधकाम विभागाला द्यावे लागेल. १० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक जागेवर बांधकाम साहित्य विखुरल्याने पार्किंगचे वाटोळे झाले आहे. आयुक्त हेमंत पवार ते जप्त करण्याचे आदेश बांधकाम विभागाला देतील काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. लोखंडी साहित्य तेथेच कापण्यात येत असल्याने अपघाताला निमंत्रण तर मिळतेच आहे; दुसरीकडे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या कक्षात जाण्याचा मार्गही या अतिक्रमणाने बाधित झाला आहे.
नोटीसचा मुहूर्त केव्हा?
१७ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेले बांधकाम साहित्य, महापालिकेच्या विजेची चोरी आणि बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी बळकावलेले महापालिकेचे आवार या तिन्ही बाबी गंभीर असताना जुझर सैफीला बांधकाम विभागाने अद्याप साधी नोटीसही दिली नाही. ते सैफीच्या ताटाखालचे मांजर झाले आहे.
अतिक्रमणाकडे कानाडोळा
आयुक्तांसह सर्वच अधिकारी आमसभा व तत्सम प्रशासकीय कामकाजासाठी महापालिकेच्या खुल्या आवारातून स्थायी वा मुख्य सभागृहात जात असतात. पदाधिकाºयांची वाहने जुझर सैफीने केलेल्या अतिक्रमणापुढे लावली जातात. त्यामुळे आवारातच ठेकेदाराने त्याचे बांधकाम साहित्य टाकले आहे, ही बाब कुणाच्याही नजरेतून सुटू शकत नाही. मात्र सर्वच अधिकारी, पदाधिकाºयांनी बेकायदेशीर घुसखोरीला अभय दिले आहे.

Web Title: Contractor Juzer Saifi of the Municipal Premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.