समाजकारणातून काँग्रेसला मजबुती देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 10:21 PM2018-04-03T22:21:45+5:302018-04-03T22:21:45+5:30

राहुल गांधींनी टाकलेला विश्वास हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. तुम्हा लोकांच्या प्रेमामुळे राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्याची संधी मिळाली आहे. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन काँग्रेस पक्षाला मजबूत करू. २०१९ मध्ये पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेत येईल, असा विश्वास आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

The Congress will strengthen the society through social work | समाजकारणातून काँग्रेसला मजबुती देऊ

समाजकारणातून काँग्रेसला मजबुती देऊ

Next
ठळक मुद्देयशोमती ठाकूर : तिवस्यात जंगी स्वागत; सोटागीर महाराज, राष्ट्रसंतांना नमन

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : राहुल गांधींनी टाकलेला विश्वास हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. तुम्हा लोकांच्या प्रेमामुळे राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्याची संधी मिळाली आहे. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन काँग्रेस पक्षाला मजबूत करू. २०१९ मध्ये पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेत येईल, असा विश्वास आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदर्भातील एकमेव महिला आमदार काँग्रेसच्या यशोमती ठाकूर याची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती केली. यानंतर सोमवारी प्रथमच तिवसा येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे ढोल-ताशे व फटाक्याच्या आतषबाजीत पक्षाच्यावतीने स्वागत-सत्कार करण्यात आला. तिवसा तालुका, शहर व महिला काँग्रेसच्यावतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सर्वप्रथम सुरवाडी, पेट्रोल पंप चौक येथे यशोमती ठाकुरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर आ. ठाकूर यांनी तिवसा नगरीचे आराध्यदैवत सोटागीर महाराज व गुरुकुंज मोझरी येथे तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन यशोमती ठाकुर यांनी घेतले यावेळी जि.प. शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख, माजी सभापती दिलीपराव काळबांडे, नगराध्यक्ष राजकन्या खाकसे, तिवसा तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, संजय देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्ष छाया दंडाळे, उपाध्यक्ष वैभव वानखडे, जि.प.सदस्य अभिजित बोके, पूजा आमले, अलका काळे, लोकेश केने, सचिन गोरे, अतुल देशमुख, जावरा कामनापूर येथील विश्वासराव बारबुदे, देवानंद चिचखेडे, भारत खैरकार, विनय चिचखेडे, हरिदास ढोके, बळीराम यावले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The Congress will strengthen the society through social work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.