फिनले मिलमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:36 PM2018-08-06T22:36:09+5:302018-08-06T22:36:39+5:30

येथील फिनले मिलमध्ये सोमवारी दुपारी २.४५ वाजता इंजिनीअरिंग विभागात एअर कॉम्प्रेसर मशीनचा स्फोट झाला. त्यातील काही लोखंडी भाग व गरम पाणी निघाल्याने तीन कामगार भाजण्यासह जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Compressor explosion in Finlay Mill | फिनले मिलमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट

फिनले मिलमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट

Next
ठळक मुद्देतीन गंभीर, एक किरकोळ जखमी : अधिकाऱ्याच्या बेपर्वाईने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : येथील फिनले मिलमध्ये सोमवारी दुपारी २.४५ वाजता इंजिनीअरिंग विभागात एअर कॉम्प्रेसर मशीनचा स्फोट झाला. त्यातील काही लोखंडी भाग व गरम पाणी निघाल्याने तीन कामगार भाजण्यासह जखमी झाले. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रवि राधेश्याम चंदेले (४०, रा. अचलपूर), दिनेश जामूनकर (२८, रा. माखला, ता. चिखलदरा), राजकुमार वानखडे (२६, रा. वरूड), प्रशांत माकोडे (३४, रा. अकोट) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. त्यांच्यावर परतवाडा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार फिटर, वेल्डर, हेल्पर म्हणून इंजिनीअरिंग विभागात कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी एअर कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने ते जखमी झाले. त्यांना तत्काळ इतर कामगारांनी रुग्णालयात दाखल केले. या स्फोटात रवि चंदेले यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि दोन्ही पायांना जखमा झाल्या आहेत. संबंधित अधिकाºयांच्या बेपर्वाईमुळे हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. कॉम्प्रेसरमध्ये गरम पाण्यापासून वाफ बनविली जाते त्या वाफेवर फिनले मिलमधील यंत्रे चालतात. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हा अपघात झाला.
आग लागल्याने एक जखमी
फिनले मिलच्या एका विभागात स्पार्किंग होऊन आग लागल्याने कैलास चंदन बटवे (२२) हा युवक रविवारी भाजण्यासह पडल्याने जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. फिनले मिलमध्ये कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून, कामगारांमध्ये या विषयात मोठ्या प्रमाणात रोष दिसून आला. सुरक्षा साहित्य दिले जात नसल्याचा आरोपही ‘लोकमत’शी बोलताना काही कामगारांनी केला.

कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना कामगार घाबरले. त्यांनी हातातील साहित्य सोडून पळण्याचा प्रयत्न केला. जखमींची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- मोहम्मद हारून मणियार, प्रबंधक (दुरुस्ती व सुरक्षा) फिनले मिल अचलपूर

Web Title: Compressor explosion in Finlay Mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.