स्वच्छता कंत्राटदार बॅकफूटवर, सपशेल शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 10:41 PM2018-01-01T22:41:56+5:302018-01-01T22:42:25+5:30

कंत्राटी स्वच्छता कामगारांना ४२३ रुपये मेहनताना द्यावा, अन्यथा १ जानेवारीपासून बेमुदत स्वच्छता बंदचा इशारा देणाऱ्या कंत्राटदारांनी सोमवारी प्रशासनासमोर सपशेल शरणागती पत्करली.

Cleaner Contractor on Backfoot, Supervisor Surrender | स्वच्छता कंत्राटदार बॅकफूटवर, सपशेल शरणागती

स्वच्छता कंत्राटदार बॅकफूटवर, सपशेल शरणागती

Next
ठळक मुद्देबहिष्कारास्त्र मागे : आयुक्तांची ठाम भूमिका

आॅनलाईन लोकमत
अमरावती : कंत्राटी स्वच्छता कामगारांना ४२३ रुपये मेहनताना द्यावा, अन्यथा १ जानेवारीपासून बेमुदत स्वच्छता बंदचा इशारा देणाऱ्या कंत्राटदारांनी सोमवारी प्रशासनासमोर सपशेल शरणागती पत्करली. आयुक्त हेमंत पवार यांनी ठाम प्रशासकीय भूमिका घेतल्याने या कंत्राटदारांनी प्रशासनाची माफी मागितली.
नोव्हेंबर महिन्यापासून स्वच्छता कामगारांना २५० रुपयांऐवजी ४२३ रुपये दैनिक मोबदला द्यावा, आजच त्याबाबतची वर्क आॅर्डर द्यावी, अन्यथा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दैनंदिन स्वच्छतेचे काम करणार नाही, असा इशारा सर्व ४३ स्वच्छता कंत्राटदारांनी प्रशासनाला ३० डिसेंबर रोजी दिला होता. स्थायी समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतरही प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्त हेमंत पवार यांनी अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कंत्राटदार प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याची भूमिका व्यक्त केली. कंत्राटदारांच्या बेमुदत बंदच्या धमकीला न जुमानता महापालिका आस्थापनेवरील ८०० स्वच्छता कामगारांच्या बळावर शहराची स्वच्छता करण्याचा शब्द यंत्रणेकडून आयुक्तांना मिळाला. त्यामुळे तुम्ही खुशाल संपावर जा, आमच्याकडे पर्यायी सशक्त व्यवस्था असल्याचे आयुक्तांनी कंत्राटदार असोसिएशनला ठणकावून सांगितले. ४२३ रुपयांप्रमाणे प्रशासन सकारात्मकच आहे, त्याबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे, काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर प्रशासन त्याप्रमाणे देयके काढेल, असे आयुक्तांनी या कंत्राटदारांना बजावले.
प्रशासन वाकत नसल्याचे पाहून कंत्राटदार असोशिएशनचे संजय माहूरकर आणि त्यांचे सहकारी बॅकफूटवर आले. सोमवारी दुपारीे माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वात अमरावती साफसफाई कंत्राटदार असोसिएशनच्या सदस्यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यात प्रशासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यात आली.

स्वच्छता कंत्राटदारांनी १ जानेवारीपावसून काम बंदचा इशारा दिला होता. सोमवारी सकाळी त्यांनी काम केले नाही.हा प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न होता.चर्चेनंतर कंत्राटदारांनी अटी-शर्तीशिवाय काम करण्यास तयार असल्याचे सांगितले.
- हेमंत पवार, आयुक्त

Web Title: Cleaner Contractor on Backfoot, Supervisor Surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.