चिमुरड्याच्या हत्येला नरबळीची किनार !

By admin | Published: February 28, 2017 12:04 AM2017-02-28T00:04:32+5:302017-02-28T00:04:32+5:30

निर्दयी पित्याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून प्राप्त झालेल्या मुलाची निर्घृ$ण हत्या केल्याची घटना १७ फे्रब्रुवारी रोजी अकोट येथे उघड झाली.

Charmudu's killing of brutality! | चिमुरड्याच्या हत्येला नरबळीची किनार !

चिमुरड्याच्या हत्येला नरबळीची किनार !

Next

मृताच्या आईने व्यक्त केली शंका : सीबीआय चौकशीची मागणी
अमरावती : निर्दयी पित्याने पत्नीच्या पहिल्या पतीपासून प्राप्त झालेल्या मुलाची निर्घृ$ण हत्या केल्याची घटना १७ फे्रब्रुवारी रोजी अकोट येथे उघड झाली. या हत्याकांडात फे्रजरपुरा पोलिसांनी रमनचे सावत्र वडील मंगेश नामदेव दांडगे (रा. लुंबिनीनगर) याला अटक केली. मात्र, हत्येपूर्वी रमन दांडगेला कुठे डांबून ठेवण्यात आले, या हत्येत आणखी कोणी मदत केली का, त्याचे साथीदार कोण, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. तसेच रमनची हत्या ही नरबळीचा प्रकार नाही ना, अशी शंकाही त्याच्या आईने व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रमनच्या आई प्रज्ञा दांडगे यांनी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्याकडे निवेदन सादर करून केली आहे.
आठ वर्षीय रमन दांडगे हा ९ फेब्रुवारी रोजी शाळेत गेल्यानंतर तो सायंकाळपर्यंत घरी परतला नव्हता. त्यामुळे त्याची आई प्रज्ञा दांडगे यांनी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून रमनचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी रमनचे सावत्र वडील मंगेश दांगडे यांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यानेच रमनच्या हत्येची कबुली दिली. रमनला शाळेतून घेऊन गेल्यावर मंगेश दांडगेने त्याला अकोट येथील वाई गावात नेले. तेथील जंगलाच्या भागात नेऊन रमनची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह पेट्रोल जाळून टाकला. या प्रकरणात पोलिसांनी मंंगेश दांडगेविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवूून त्याला अटक केली. फे्रजरपुरा पोलिसांनी आरोपी मंगेश दांडगेला वाई गावातील घटनास्थळी नेले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन केला. दरम्यान पोलिसांनी मंगेश दांडगेची पोलीस कोठडीत चौकशी करून त्याच्याजवळून गुन्ह्यात वापरेले साहित्य व दुचाकी जप्त केली. या घटनेमुळे जिल्ह्याभरात खळबळ उडाली. मंगेश दांडगेची पहिली पत्नी सोडून गेल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले होते. दुसऱ्या पत्नीजवळ पहिल्या पतीचा मुलगा होता. काही दिवस संसारिक जीवनात घालविल्यानंतर मंगेश व त्यांच्या पत्नीत वाद होऊ लागले. कौटुंबिक वादानंतर मंगेशने रमनचे अपहरण केले. पत्नीच्या रागावर मंगेशने चिमुरड्या रमनचीच हत्या करून त्याचा मृतदेह जाळून टाकला. मात्र, मंगेश व त्याची पत्नीत वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवून मंगेशची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. हत्येपूर्वी रमनचे सावत्र वडील मंगेश दांडगे हा त्याची पत्नी प्रज्ञा दांडगेसोबत गुप्तधनाबद्दल चर्चा करीत होता. त्यामुळे मंगेश दांडगे याने रमनसारख्या अन्य बालकांचादेखील नरबळी दिला असावा, रमनची हत्या ही नरबळीचा प्रकार तर नाही, अशी शंका रमनच्या आईने व्यक्त केली आहे. या हत्येत मंगेशच्या आणखी काही साथीदारांचा सहभाग असू शकतो, त्यामुळे रमनच्या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रज्ञा दांडगे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्यासह मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Charmudu's killing of brutality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.