म्हशींनी वाचविले मालकाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:12 AM2017-12-11T04:12:53+5:302017-12-11T04:13:15+5:30

अस्वलाने केलेला हल्ला शेजारी चरणा-या म्हशींनी एकत्र येऊन परतवून लावीत आपल्या मालकाचे प्राण वाचविल्याची घटना रविवारी सकाळी मेळघाटच्या जंगलात घडली.

The buffaloes saved the owner's life | म्हशींनी वाचविले मालकाचे प्राण

म्हशींनी वाचविले मालकाचे प्राण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा (अमरावती) : अस्वलाने केलेला हल्ला शेजारी चरणा-या म्हशींनी एकत्र येऊन परतवून लावीत आपल्या मालकाचे प्राण वाचविल्याची घटना रविवारी सकाळी मेळघाटच्या जंगलात घडली. मेळघाटलगतचा पशुपालक ठाक्या गायन (४०, रा. कुकरू, मध्यप्रदेश) आपल्या १५ ते २० म्हशी चराईसाठी रविवारी सकाळी सात वाजता जंगलात घेऊन गेला.
म्हशी चरत असताना ठाक्यावर अस्वलाने हल्ला केला. त्याचे पोट पकडून अस्वलाने डोक्याला चावा घेतला. ठाक्याचा आरडा-ओरडा ऐकून म्हशी धावून आल्या आणि त्यांनी अस्वलाला हुसकाविले. तोवर ग्रामस्थही धावून आले आणि त्यांनी गंभीर जखमी ठाक्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे ठाक्याचे प्राण वाचू शकले. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण होते़ अस्विलींना तात्काळ पकडावे, अशी मागणी होत आहे़

Web Title: The buffaloes saved the owner's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.