कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचा 24 तासानंतर सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 16:07 IST2018-11-07T15:48:51+5:302018-11-07T16:07:17+5:30
अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेलेला 14 वर्षीय मुलगा वाहून गेला. कालव्याच्या अती वेगानं वाहणाऱ्या पाण्यात बालक वाहून गेलेल्या या मुलाचा तब्बल 24 तासांनंतर मृतदेह सापडला आहे.

कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचा 24 तासानंतर सापडला मृतदेह
सूरज दाहाट
तिवसा(अमरावती) - अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेलेला 14 वर्षीय मुलगा वाहून गेला. कालव्याच्या अती वेगानं वाहणाऱ्या पाण्यात बालक वाहून गेलेल्या या मुलाचा तब्बल 24 तासांनंतर मृतदेह सापडला आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता तिवसा सातरगाव रोडनजीक आनंदवाडी परिसराजवळ ही घटना घडली होती. सुमित राजू काळे असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. त्याचा मृतदेह शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून रेस्क्यू टीमला पाचारणला करण्यात आले होते. त्याचा मृतदेह सापडला नसल्याने प्रशासनाची युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवण्यात आली होती. अखेर24 तासानंतर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गट्टू कारखान्याजवळ त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना नागरिकांना दिसला.
सुमित हा अशोकनगर तिवसा येथील रहिवासी होता. मंगळवारी दुपारी तो आपल्या मित्रांसोबत कालव्यात आंघोळीसाठी गेलेला असताना ही दुर्घटना घडली.