७५० शेतकऱ्यांची जमीन सक्तीने होणार खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:10 PM2018-05-28T22:10:38+5:302018-05-28T22:10:50+5:30

कृषिसमृद्धी प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती प्राप्त झाली असून, आता तीन तालुक्यांतील ७५० शेतकऱ्यांची ३७० हेक्टर जमीन भूसंपादन कायदा महामार्ग अधिनियम अंतर्गत सक्तीने खरेदी करण्याचे आदेश राज्य शासनाने पारित केले आहेत.

750 farmers will be forced to buy land | ७५० शेतकऱ्यांची जमीन सक्तीने होणार खरेदी

७५० शेतकऱ्यांची जमीन सक्तीने होणार खरेदी

Next
ठळक मुद्देशासनादेश जारी : कृषिसमृद्धी प्रकल्प, अधिकाऱ्यांच्या नियुक्ती

मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : कृषिसमृद्धी प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती प्राप्त झाली असून, आता तीन तालुक्यांतील ७५० शेतकऱ्यांची ३७० हेक्टर जमीन भूसंपादन कायदा महामार्ग अधिनियम अंतर्गत सक्तीने खरेदी करण्याचे आदेश राज्य शासनाने पारित केले आहेत. याकरिता अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
राज्याच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा-मोहरा बदलविणाऱ्या नागपूर-मुंबई कृषिसमृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्याचा शेवटचा टप्पा महसूल प्रशासन पूर्ण करीत आहे़ दर आठवड्याला थेट मंत्रालयातून त्याचे अपडेट घेतले जात आहेत. एकीकडे महामार्गाच्या कामासाठी ई-निविदा मागविण्यात येत असताना, दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन या प्रकल्पाकरिता दिलेली नाही़ त्यामुळे राज्य शासनाने भूसंपादन कायदा व्यतिरिक्त महाराष्ट्र महामार्ग कलम १५़,४ अन्वये तीनही तालुक्यांतील ७५० शेतकºयांची ३७० हेक्टर जमीन सक्तीने खरेदी केली जाणार आहे़
धामणगावात सर्वाधिक खरेदी
तालुक्यातील ६७२ शेतकऱ्यांकडून आतापर्यंत २८४़८६ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली़ त्यांना १०६ कोटी १५ लाख रूपयांचा मोबदला देण्यात आला आहे़ चांदूर रेल्वे तालुक्यातील ३५९ शेतकऱ्यांनी १३७़७६ हेक्टर शेतजमीन कृषिसमृद्धीसाठी दिली आहे़ या शेतकऱ्यांच्या खात्यात ४८ कोटी ३५ लाख रुपये जमा झाले आहेत़ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ६४६ शेतकऱ्यांकडून २५८़५६ हेक्टर शेतजमीन शासनाने खरेदी केली आहे़ त्याच्या मोबदल्यात ११४ कोटी ८५ लाख रुपये देण्यात आले आहेत़

महाराष्ट्र महामार्ग अधिनियमांच्या विविध कलमान्वये शासनाने शेतकऱ्यांची जमीन सक्तीने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पार पाडली जाईल.
- स्रेहल कनीचे,
उपविभागीय अधिकारी,
चांदूर रेल्वे

Web Title: 750 farmers will be forced to buy land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.