७४८ कोटींच्या पीककर्जाचे पुनर्गठन !

By admin | Published: April 29, 2016 12:09 AM2016-04-29T00:09:17+5:302016-04-29T00:09:17+5:30

खरीप हंगामात अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या १ हजार ९६७ गावांमध्ये शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती ...

748 crore crop loan reorganized! | ७४८ कोटींच्या पीककर्जाचे पुनर्गठन !

७४८ कोटींच्या पीककर्जाचे पुनर्गठन !

Next

३० एप्रिल 'डेडलाईन' : १ लाख ७ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

गजानन मोहोड अमरावती
खरीप हंगामात अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या १ हजार ९६७ गावांमध्ये शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती व सहकारी पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय २६ एप्रिल रोजी शासनाने घेतला. या निर्णयाचा जिल्ह्यामधील १ लाख ६ हजार ६९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यांच्या ७४८ कोटी १६ हजाराच्या पीककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे. खरीप पीककर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांना ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करुन यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.
या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. खरीप पीककर्जाच्या परतफेडीचा ३१ मार्च हा कालावधी असल्याने जिल्ह्यातील पैसेवारी ५० पैशांच्या आत असणाऱ्या १९६७ गावांमधील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकरणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची संमती घेऊन सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पीककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात पुनर्गठन करण्याचे निर्देश आहेत.

पाच वर्षांसाठी पुनर्गठन
अमरावती : सन २०१६ मध्ये जिल्ह्यात १ लाख ७८ हजार ४७६ शेतकऱ्यांना १४२३५८.५२ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा बँकेने ५६३२७ शेतकऱ्यांना ३८९७०.५२ लाखांचे कर्जवाटप केले होते. राष्ट्रीयीकृत बँकांनी ११८६८४ शेतकऱ्यांना १००३३६.०० लाखाचे व ग्रामीण बँकांनी २४०३ शेतकऱ्यांना २२६८.०० लाखाचे कर्जवाटप केले होते. यापैकी जिल्हा बँकेच्या ३४९२२ शेतकरी सभासदांनी २६५६१.२९ लाखांचा ३१ मार्च २०१६ अखेर कर्जाचा भरणा केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३५६०५ शेतकऱ्यांनी ४००७५.०० लाखांचा व ग्रामीण बँकांच्या ३५९ शेतकरी सभासदांनी २६७.०२ लाखांच्या कर्जाचा भरणा केला आहे.
३१ मार्च २०१६ अखेर पीककर्जाची शिल्लक बाकी असणाऱ्या जिल्हा बँकेच्या २१४०५ शेतकरी सभासदांचे १२४०९.२३ लाखाचे व राष्ट्रीयकृत बँकांच्या ८३०७९ शेतकऱ्यांना ६०२६१.०० लाख व ग्रामीण बँकेच्या ७०३ शेतकरी सभासदांच्या ५४१.९३ लाख व खासगी बँकांच्या १६८२ शेतकरी सभासदांच्या १५८८.०० कोटींच्या पीककर्जाचे शेतकऱ्यांच्या संमतीने ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने कर्जाचे पुनर्गठन करून शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे सतत नापिकी, दुष्काळात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याचे हे संकेत आहे. बँकाना हे आदेश लागू करण्यात आल्याने विंवचनेत असलेला शेतकरी काही अंशी संकटातून सावरणार आहे.

यंदा २६२.६९ कोटींचे पीक कर्जवाटप
चालू वर्षी जिल्ह्यात सन २०१६-१७ करीता जिल्हा बँकेला ६९६.७५ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना १४३६.९३ कोटी व ग्रामीण बँकांना १२ कोटी असा एकूण २१४५.६८ कोटींच्या पीक कर्जवाटपाचा लक्षांक देण्यात आला होता. २२ एप्रिल २०१६ अखेर जिल्हा बँकेने २७३४१ शेतकऱ्यांना २३२.५७ पीककर्जाचे वाटप केले आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी ३४८० शेतकऱ्यांना ३०.१२ कोटी असे एकूण ३०८२१ शेतकऱ्यांना २६२.६९ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

Web Title: 748 crore crop loan reorganized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.