लाभापूर्वीच कपाशी, धानाच्या मदतनिधीत २३२ कोटींची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:42 PM2018-05-12T15:42:03+5:302018-05-12T15:42:11+5:30

शेतकऱ्यांच्या मदतनिधीत ४८ तासांत दोन शासनादेश जारी करून शासनाने घूमजाव केला व शेतकऱ्यांच्या २३२.३० कोटींच्या मदतनिधीला फाटा दिला असल्याचे वास्तव आहे.

232 crores cut in cash subsidy | लाभापूर्वीच कपाशी, धानाच्या मदतनिधीत २३२ कोटींची कपात

लाभापूर्वीच कपाशी, धानाच्या मदतनिधीत २३२ कोटींची कपात

Next
ठळक मुद्देदोन दिवसात दोन शासनादेशपहिल्या टप्प्यात १,१६१ ऐवजी ९२९ कोटी वितरित

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात बाधित कपाशी व धान पिकांना ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे ३,४८४.६० कोटींची मदत समान तीन टप्प्यात देण्याचा निर्णय ८ मे रोजी शासनाने घेतला. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी १,१६१.६३ कोटींचा पहिला टप्पा देय असताना, ९ मे रोजी ९२९.२३ कोटी रुपये अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केले. शेतकऱ्यांच्या मदतनिधीत ४८ तासांत दोन शासनादेश जारी करून शासनाने घूमजाव केला व शेतकऱ्यांच्या २३२.३० कोटींच्या मदतनिधीला फाटा दिला असल्याचे वास्तव आहे.
गतवर्षीच्या खरिपामध्ये कपाशीवर बोंडअळी व धान पिकांचे तुडतुड्यांमुळे मोठ्या प्रमाणात झाले. यामध्ये ३३ टक्क्यांवर बाधित क्षेत्राला ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय शासनाने १७ मार्च २०१८ रोजी घेतला. राज्यात बाधित कपाशीला ३,२४६.७७ व धानासाठी २३७.८३ कोटी अशी एकूण ३,४८४.६० कोटींच्या निधीची आवश्यकता असताना, या मदतनिधीचे तीन समान टप्पात वाटप करण्यास ८ मे २०१८ च्या शासनाने मान्यता दिली. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ मे रोजी तीन समान टप्प्यांपैकी पहिला टप्पा १,१६१ कोटींचा देय असताना ९२९ कोटी रुपये अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केले. एकंदर तीन दिवसांचा घटनाक्रम पाहता, शासनाने शेतकऱ्यांच्या मदतनिधीत शब्दच्छल करीत घूमजाव केला आहे.

जिल्हानिहाय उपलब्ध निधी
महसूल विभागाच्या १० मेच्या शासनादेशानुसार नागपूर जिल्ह्यास १८.७४ कोटी, भंडारा १८.११, गोंदिया ११.०७, वर्धा ४१.०१, चंद्रपूर ४७.२१, गडचिरोली ९.२०, अमरावती ४८.७०, अकोला ३६.१४, यवतमाळ ९३.११, बुलडाणा ३५.८२, वाशिम ४.११, औरंगाबाद ७९, बीड ६८.४२, जालना ७३.४३, नांदेड ४६.९७, लातूर २३०, परभणी ४२.१२, हिंगोली ९.७६, उस्मानाबाद ३.६०, नाशिक ७.०२, धुळे ५४.१६, नंदुरबार २३.९०, अहमदनगर ३३.३९, जळगाव ११८.१९, पुणे ०.१, सोलापूर ०.८५ व पालघर जिल्ह्यास २.७८ कोटी उपलब्ध करण्यात आले आहेत.

Web Title: 232 crores cut in cash subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी