१२ घरांची पडझड, ४५० हेक्टर बाधित; वादळासह अवकाळी,अमरावती तालुक्यात सर्वाधिक नुकसान

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 13, 2024 08:05 PM2024-04-13T20:05:57+5:302024-04-13T20:07:02+5:30

जिल्ह्यात वादळासह अवकाळीचे सत्र पाच दिवसांपासून सुरु आहेर. यामध्ये दिड हजार घरांची पडझड व ५५ हजार हेक्टरमधील पिकांचे झालेले आहे.

12 houses collapsed, 450 hectares affected; | १२ घरांची पडझड, ४५० हेक्टर बाधित; वादळासह अवकाळी,अमरावती तालुक्यात सर्वाधिक नुकसान

१२ घरांची पडझड, ४५० हेक्टर बाधित; वादळासह अवकाळी,अमरावती तालुक्यात सर्वाधिक नुकसान

अमरावती : शनिवारी पहाटे चारच्या सुमारास वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने अमरावती तालुक्यात एका गुराचा मृत्यू झाला, याशिवाय जिल्ह्यात ११ घरांची पडझड झाली व ४५० हेक्टरमधील शेती, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले.

जिल्ह्यात वादळासह अवकाळीचे सत्र पाच दिवसांपासून सुरु आहेर. यामध्ये दिड हजार घरांची पडझड व ५५ हजार हेक्टरमधील पिकांचे झालेले आहे. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास जोराचे वादळ झाले. यामध्ये शहरातील इर्वीन चौक, खापर्डे बगिचा परिसरात वृक्ष उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले होते. वादळाचे नुकसान एक किमी परिसरात झालेले आहे. अमरावती तालुक्यात सात घरांची पडझड झाली. शिवाय नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन व भातकुली दोन असे ११ घरांचे नुकसान झालेले आहे.

वादळासह पावसाने अमरावती तालुक्यात ४१८ हेक्टरमधील गहू, कांदा व फळपिकांचे नुकसान जाले, याव्यतिरिक्त चिखलदरा तालुक्यात १.५ हेक्टरमध्ये आंबा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २० हेक्टरमधील उन्हाळी तिळ पिकाचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे.

Web Title: 12 houses collapsed, 450 hectares affected;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.